अहमदनगर - भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज अहमदनगर जिल्ह्यात मुस्लीम समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता.
मुस्लिम समाजाच्या वतीने पूकारण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर काहीनी रस्त्यावर नुपूर शर्माचे पोस्टर चिटकवून निषेध नोंदवला.
दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी रस्त्यावर चिटकवीण्यात आलेले पोस्टर काढून टाकले.
नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी मुस्लीम समाजाचे प्रेषित पैगंबर मोहंमद यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानाचे पडसाद देशभर उमटत असतांना आज शुक्रवारी महाराष्ट्रात देखील याचे पडसाद पहायला मिळाले.
अहमदनगर मध्ये समस्त मुस्लीम समाजाच्या वतीने आज बंद पूकरण्यात आला असला तरी लवकरात लवकर नुपूर शर्मावर कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मुस्लीम समाजाच्या वतीने देण्यात आला.