devendra fadanvis : सहकारी कारखाने खासगी लोकांच्या घशात घालणे बंद झाले पाहिजे - फडणवीस

नगर
रोहन जुवेकर
Updated Dec 18, 2021 | 19:28 IST

Privatization of co-operative factories should be stopped said devendra fadanvis : शेतकऱ्यांनी उभारलेले सहकारी कारखाने अडचणीत असल्याचे कारण देऊन खासगी लोकांच्या घशात घालणे बंद झाले पाहिजे; असे महाराष्ट्राचे विधान सभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Privatization of co-operative factories should be stopped said devendra fadanvis
सहकारी कारखाने खासगी लोकांच्या घशात घालणे बंद झाले पाहिजे - फडणवीस 
थोडं पण कामाचं
  • सहकारी कारखाने खासगी लोकांच्या घशात घालणे बंद झाले पाहिजे - फडणवीस
  • मोदी सरकारने सहकाराला जगविण्याचे काम केले
  • केंद्र सरकारने इथोनॉल बाबत स्वीकारलेल्या धोरणामुळे कारखान्यांचे दिवस पालटणार

Privatization of co-operative factories should be stopped said devendra fadanvis : प्रवरानगर: शेतकऱ्यांनी उभारलेले सहकारी कारखाने अडचणीत असल्याचे कारण देऊन खासगी लोकांच्या घशात घालणे बंद झाले पाहिजे; असे महाराष्ट्राचे विधान सभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना व प्रवरा औद्योगिक, शेक्षणिक व सांस्कृतिक समुहाच्या वतीने नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे आयोजित सहकार परिषद व शेतकरी मेळाव्यात फडणवीस बोलत होते.

देशपातळीवर सहकार खाते सुरू होताच मोदी सरकारने सहकाराला जगविण्याचे काम केले. एमएसपीच्या निर्णयाने साखर कारखाने तरले आहेत. तसेच शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे भाव देणे देखील कारखान्यांना शक्य झाले. शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. आता केंद्र सरकारने इथोनॉल बाबत स्वीकारलेल्या धोरणामुळे कारखान्यांचे दिवस पालटणार आहेत. कारखान्यांच्या वित्तीय मजबुतीसाठी तेल कंपन्यांना इथोनॉल विकत घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. 

सहकार हाच उद्धाराचा तारक आहे हे देशाला ७५ वर्षांनंतर समजले आहे. ज्या प्रवरानगरात सहकाराची मूहूर्तमेढ रोवली गेली, ज्या ठिकाणी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला त्या ठिकाणी आयोजित सहकार परिषदेसाठी देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह उपस्थित आहेत हा मोठा विलक्षण योगायोग आहे, असे गौरवौद्गार फडणवीस यांनी काढले.

सहकार परिषदेला केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबईचे चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमन विद्याधर अनासकर हे उपस्थित आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी