Rohit Pawar : अहमदनगर : भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट करत राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे आपला मोर्चा वळवला होता. बारामती ऍग्रो लिमिटेडचा आपण अभ्यास करत असल्याचे कंबोज यांनी म्हटले होते. त्यावर आधी बँकेतून घेतलेले पैसे परत कसे फेडता येईल यासंदर्भात अभ्यास करा असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. (rohit pawar ncp mla criticized bjp leader mohit kamboj over baramati agro limited tweet)
मोहित कंबोज यांना ज्याचा अभ्यास करायचा आहे त्याचा अभ्यास करावा. परंतु ज्या बँकेचे त्यांनी पैसे घेतले होते ते पैसे परत कसे करता येतील याचा आधी अभ्यास करावा. बँकेचे जे खातेदार असतील त्यांच्या वतीने मी ही विनंती करत असल्याचेही पवार म्हणाले.
अधिक वाचा : अधीक्षक अभियंता महिलांना पाहून फिरवायचा स्टीलच्या धातुच्या नग्न मूर्तीवर हात
भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत सांगितले की बारामती अग्रो लिमिटेड कंपनीच्या उपलब्धी संदर्भात मी स्वःत अभ्यास करत आहे. यामागची यशोगाथा लवकरच सर्वांसमोर शेअर करणारं असल्याच सांगत हा ट्विट रोहित पवारांना देखील टॅग करण्यात आले होते.
Yes true they have done in past , for that I have given statement and fought legally . And the account is setteled and cleared and no due was taken . — Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) December 3, 2019
मोहित कंबोज यांच्यावर ५२ कोटी रुपयांच घोटाळा केल्याचा आरोप झाल आहे. कंबोज यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेकडून ५२.८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु कंबोज यांनी या पैश्यांचा वापर दुसर्याच कामासाठी केला होता असा आरोप त्यांच्यावर आहे, या प्रकरणी कंबोज यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. इतकेच नाही तर बँक ऑफ बडोदाने त्यांना विलफुल डीफॉल्टरही घोषित केले होते. ७ जून २०२२ रोजी बँक ऑफ बडोदाने वृत्तपत्रात जाहिरात देऊन कंबोज यांचा फोटो छापला होता तसेच त्यांना विलफूल डीफॉल्टरही घोषित केले होते.
Bank of Baroda has declared you a wilful "defaulter" with regard to borrowings by a firm called Avyan Ornaments... — Anannya (@Annur2d2) December 3, 2019
Right?
Yes true they have done in past , for that I have given statement and fought legally . And the account is setteled and cleared and no due was taken . — Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) December 3, 2019
अधिक वाचा : Patra chawl scam case : पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून स्वप्ना पाटकर यांना समन्स; आज चौकशी