Shirdi : साईबाबांच्या शिर्डीच्या विकासाकरिता आणखी एक मोठा निर्णय

नगर
रोहन जुवेकर
Updated Feb 16, 2023 | 19:01 IST

Shirdi International Airport Get Night Landing Licence From DGCA Says Devendra Fadnavis : शिर्डीत दर्शनाला जाणार्‍या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे.

Shirdi International Airport Get Night Landing Licence From DGCA Says Devendra Fadnavis
साईबाबांच्या शिर्डीच्या विकासाकरिता आणखी एक मोठा निर्णय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • साईबाबांच्या शिर्डीच्या विकासाकरिता आणखी एक मोठा निर्णय
  • शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा
  • नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग खुला झाला, मुंबई ते शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली, आता शिर्डीत नाईट लँडिंगची परवानगी मिळाली

Shirdi International Airport Get Night Landing Licence From DGCA Says Devendra Fadnavis : शिर्डीत दर्शनाला जाणार्‍या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता शिर्डीत नाईट लँडिंगची सुविधा प्राप्त झाली आहे. डीजीसीएकडून याबाबतचा परवाना प्राप्त झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार मानले आहेत.

शिर्डीसाठी ही गेल्या दोन महिन्यांतील तिसरी आनंदाची बातमी आहे. नागपूर ते शिर्डी हा समृद्धी महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुला झाला. त्यापाठोपाठ मुंबई ते शिर्डी अशी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. आता नाईट लँडिंगची सवलत प्राप्त झाल्याने पहाटेच्या काकड आरतीला उपस्थित राहू इच्छिणार्‍यांना रात्री प्रवास करुन शिर्डीत येता येणार आहे. 

शिर्डी विमानतळ देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 2017 मध्ये सुरू झाले होते. पण या विमानतळावर रात्री विमान उतरविण्याची परवानगी नव्हती. शिर्डीत रात्री विमान उतरविण्याची परवानगी मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवर अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे तातडीने हा परवाना देण्याबाबत आग्रह धरला. यानंतर आज (गुरुवार 16 फेब्रुवारी 2022) सकाळी डीजीसीएकडून हा परवाना प्राप्त झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आणखी एक भर विकासात घातली आहे. यामुळे शिर्डी यात्रा तर सुलभ होईलच. शिवाय, या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे. भाविकांच्या संख्येत मोठी वाढ यामुळे अपेक्षित आहे. तसेच  स्थानिक अर्थकारणाला गती मिळणार आहे. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करुन, विमानांचे उन्हाळी वेळापत्रक लागू होईल, तेव्हा साधारणत: मार्च/एप्रिलपासून आता रात्रीचीही विमानसेवा यामुळे आता सुरू होईल, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. सध्या शिर्डीला 13 विमानसेवा आहेत. भविष्यात या सेवांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 : आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्सव

Central Railway : मध्य रेल्वेचा रात्री ब्लॉक, या ट्रेन असणार बंद

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी