MNS Morcha: वीज वितरण कार्यालयाची मनसेकडून तोडफोड, मनसे पदाधिकारी-कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

नगर
उमेर सय्यद
Updated Nov 26, 2020 | 17:59 IST

वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी-कोपरगाव येथील वीज वितरण कार्यालयाची तोडफोड केली आहे. 

shirdi kopargaon mahavitaran office vandalise by mns activist police detained mns workers
MNS Morcha: वीज वितरण कार्यालयाची मनसेकडून तोडफोड, मनसे पदाधिकारी-कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात 

थोडं पण कामाचं

  • शिर्डी - कोपरगाव वीज वितरण कार्यालयाची मनसेकडून तोडफोड 
  • मनसे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनां पोलिसांनी घेतले ताब्यात 

शिर्डी : वाढीव वीज बिलाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढून आंदोलन कऱण्यात आले. शिर्डी (Shirdi) येथील कोपरगाव (Kopargaon) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांनी कोपरगाव येथील वीज वितरण कार्यालयाची (Mahavitaran office) तोडफोड केली आहे. दरम्यान या तोडफोडीनंतर पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्र सरकारने वाढीव वीज बिलामध्ये नागरिकांना सूट द्यावी या मागणीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान लॉकडाऊन काळापासून कोपरगाव वीज वितरण कार्यालयाला वाढीव वीज बिलासंदर्भात वारंवार निवेदन देवूनही बिल कमी होत नाही, त्यात ऊर्जा मंत्र्यांनी दिलेले आश्वासन देखील पाळले नाही याचा निषेध म्हणून आज वीज वितरण कार्यालयाची तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा प्रमुख संतोष गंगवाल यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज होणार असलेल्या आंदोलनाची माहिती आगोदरच देण्यात आली होती. मात्र होणारे आंदोलन हे शांत पद्धतीने होणारं असल्याच सांगण्यात आलं होतं, असं असलं तरी वाढीव वीज बिलासंदर्भात जनता हैराण झाली असून लॉकडाऊनमध्ये काहींचे पगार कपात तर काहींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहे अशा परिस्थितीत भरमसाठ आलेले वाढीव वीज बिल कमी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी तोडफोड झाल्याची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, शहर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक बोरसे, उपनिरीक्षक भारत नागरे हे घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी मनसेचे उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल, तालुकाप्रमुख अनिल गायकवाड, तालुका मार्गदर्शक सुनील फंड, अपंग सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गंगवाल तसेच अन्य एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी