Shirdi Sai Baba: शिर्डी साई मंदिर पाडव्यापासून उघडणार, दर्शनासाठी जाणून घ्या नियमावली

Guidelines for darshan of Shirdi Sai Baba temple: दिवाळी पाडव्यापासून राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात येणार आहेत. शिर्डीतील साई मंदिराने भाविकांना दर्शनासाठी एक नियमावली जाहीर केली आहे. 

Shirdi Sai Baba
शिर्डी साईबाबा (फोटो सौजन्य: sai.org.in) 
थोडं पण कामाचं
 • दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरे, धार्मिकस्थळे उघडणार 
 • शिर्डीतील साई मंदिर संस्थानने दर्शनाच्या संदर्भात जाहीर केली नियमावली
 • गर्दी टाळून भाविकांना दर्शन मिळावे यासाठी नियमावली जाहीर 

शिर्डी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी (Temple reopnes) दिली आहे. दिवाळी पाडव्या (Diwali Padwa)पासून राज्यातील मंदिरे आणि इतर धार्मिकस्थळे उघडण्यात येणार आहेत. मंदिरे उघडण्यासाठी सर्वच धार्मिक संस्थानांनी खास तयारी केली असून भाविकांना सुरक्षित आणि गर्दी न करता योग्य पद्धतीने दर्शन मिळावे यासाठी उपाययोजना करुन नियमावली सुद्धा जाहीर केली आहे. शिर्डी साई बाबा मंदिर संस्थानने (Shirdi Sai Baba Temple Sansthan Trust) सुद्धा भाविकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. पाहूयात कशी आहे ही नियमावली. 

अशी आहे शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानची नियमावली

 1. दिवसभरात ५ हजार भाविकांनाच ऑनलाईन पास, एक हजार स्थानिकांना प्रवेश
 2. मतदार ओळखपत्र दाखवल्यावरच ग्रमस्थांना साई मंदिरात प्रवेश मिळणार 
 3. आरतीचे पास आरक्षित असणार 
 4. आरतीसाठी पास असलेल्या ५० भाविकांनाच प्रवेश मिळणार
 5. वेळ आणि तारखेनुसारच भाविकांना दर्शन मिळणार आहे 
 6. भाविकांना मंदिरात हार, फुले, प्रसाद नेता येणार नाहीये
 7. मोबाइल आणि इतर वस्तू मंदिरात नेण्यास मनाई आहे 
 8. गर्भवती, गरोदर महिला, लहान मुले, वृद्ध व्यक्तींना मंदिरात प्रवेश मिळणार नाही 
 9. निवास व्यवस्थेसाठी बुकिंग करणे आवश्यक आहे
 10. निवास व्यवस्थेसाठी ८० टक्के ऑनलाईन बुकिंग तर २० टक्के भाविकांना ऑफलाईन बुकिंग करता येणार 
 11. मंदिरात फेस मास्क लावणे अनिवार्य आहे 
 12. भाविकांचे थर्मल स्कॅनिंग होणार 

धार्मिकस्थळे उघडण्यात यावीत अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. अखेर आता राज्य सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे. भाविकांना कोविड संबंधित सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे उघडण्यात येणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हा फक्त सरकारी आदेश नसून श्रींची इच्छा: मुख्यमंत्री

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वत:बरोबर इतरांचे रक्षण करा.

हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं'ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील!.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी