धक्कादायक, अक्षय कुमारच्या 'गब्बर' चित्रपटातील घटना प्रत्यक्षात, मृत्यूनंतर देखील दिला गेला उपचार 

नगर
उमेर सय्यद
Updated Sep 28, 2021 | 16:14 IST

अहमदनगर शहरातील न्यूकलेस हॉस्पिटल चे संचालक डॉ.गोपाल बहुरूपी आणि डॉ. सुधीर बोरकर यांनी आपल्या वडिलांना मारले असून या दोन्ही डॉक्टरांवर  योग्य ते कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नगर शहरातील अशोक खोकराळे यांनी पत्

Shockingly, the incident in Akshay Kumar's film 'Gabbar' was actually treated even after death
RTPCR रिपोर्ट नसतांना देखील कोविड रुग्ण दाखविले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अहमदनगर शहरातील न्यूकलेस हॉस्पिटल चे संचालक डॉ.गोपाल बहुरूपी आणि डॉ. सुधीर बोरकर यांनी आपल्या वडिलांना मारले असून या दोन्ही डॉक्टरांवर  योग्य ते कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नगर शहरातील अशोक खोकराळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
  • उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचीकाकर्ते अशोक खोकराळे  यांच्या वडीलांवर अहमदनगर कोविड सेंटर आणि न्यूक्लेस हॉस्पिटल येथे २०२० साली उपचार चालू होते.
  • त्यांचा मृत्यू झाला मात्र मृत्यूनंतर अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहे. 

अहमदनगर :  अहमदनगर शहरातील न्यूकलेस हॉस्पिटल चे संचालक डॉ.गोपाल बहुरूपी आणि डॉ. सुधीर बोरकर यांनी आपल्या वडिलांना मारले असून या दोन्ही डॉक्टरांवर  योग्य ते कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नगर शहरातील अशोक खोकराळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. (Shockingly, the incident in Akshay Kumar's film 'Gabbar' was actually treated even after death)

उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचीकाकर्ते अशोक खोकराळे  यांच्या वडीलांवर अहमदनगर कोविड सेंटर आणि न्यूक्लेस हॉस्पिटल येथे २०२० साली उपचार चालू होते. त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला मात्र मृत्यूनंतर अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहे. 

अशोक खोकराळे यांचे वडील बबनराव खोकराळे यांना घशात खवखव होत असल्याने अहमदनगर कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र कुटुंबांना काही न सांगता बबनराव खोकराळे यांना न्यूकलेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्या ठिकाणी दाखल केल्यानंतर त्यांच्यावर कोरोना उपचार करण्यात आले यावेळी त्यांची कोणतीही चाचणी करण्यात आली नव्हती तीन दिवसानंतर बबनराव खोकराळे यांचा मृत्यू झाला.

मात्र मृत्यूनंतर काही संशयास्पद गोष्टी आढळल्याने अशोक खोकराळे यांनी याबाबत पाठपुरावा करून हॉस्पिटल मधील उपचाराबाबत सर्व कागदपत्रे जमा करून अहमदनगरच्या जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे दाद मागितली होती. मात्र अहमदनगरमध्ये न्याय मिळत नसल्याने अखेर अशोक खोकराळे  यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयात सर्व कागदपत्रे दाखल केल्यानंतर औरंगाबाद हायकोर्टाने याबाबत अहमदनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरना यांनी सहा जणांची चौकशी समिती स्थापन करून चौकशी केली असता यातील अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहे. 

त्यामध्ये विशेषत: रुग्णाचा कुठल्याही प्रकारचा आरटीपीसीआर रिपोर्ट नसतांना रुग्णाला कोविडचे उपचार दिले कसे. रुग्णाला रेमडिसिव्हिर इंजेक्शन देताना शासकीय सर्व नियम धाब्यावर बसवून एकाच दिवसात ५ इंजेक्शन देण्यात आले. एकाच रुग्णालयात दोन वेगवेगळ्या वेळेला रुग्णाला मृत घोषीत करण्यात आले. रुग्ण मृत झाल्यानंतर देखील रुग्णावर कोविडचे उपचार दिले गेले. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर देखील त्याच्या नातेवाईकांना न कळवता मृताच्या मृतदेहाची देखील व्हीलेवाट लावण्यातबाबत तफावत असल्याचे समितीने उच्चन्यायालयात दाखल केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले असल्याची माहिती मृताचे चिरंजीव अशोक खोकराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.  

दरम्यान या बाबतचा अहवाल  औरंगाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबर २१ ला ठेवण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी