ST driver suicide: एसटी डेपोत बसच्या मागे गळफास घेत चालकाची आत्महत्या, अहमदनगरमधील घटनेने खळबळ

ST driver suicide ahmednagar: एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हमदनगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon Ahmednagar) येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीच्या मागच्या भागाला गळफास घेऊन आत्महत्या (ST driver commits suicide in bus depot) केली आहे.

st driver commits suicide in shevgaon bus depot ahmednagar district dirver found hanging on bus backside
एसटी डेपोत बसच्या मागे गळफास घेत चालकाची आत्महत्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे (ST employee suicide) सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे.
  • आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
  • अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon Ahmednagar) येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीच्या मागच्या भागाला गळफास घेऊन आत्महत्या (ST driver commits suicide in bus depot) केली आहे.

ST driver suicide, Shevgaon, ahmednagar: अहमदनगर : एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे (ST employee suicide) सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon Ahmednagar) येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीच्या मागच्या भागाला गळफास घेऊन आत्महत्या (ST driver commits suicide in bus depot) केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (st driver commits suicide in shevgaon bus depot ahmednagar district dirver found hanging on bus backside)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक एसटी कर्मचाऱ्याचे नाव दिलीप हरिभाऊ काकडे असे आहे. दिलीप काकडे हे परिवहन महामंडळात चालक म्हणून कार्यरत होते. शेवगाव येतील एसटी डेपोत उभ्या असलेल्या बसच्या मागच्या बाजूला गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

दरम्यान दिलीप काकडे यांनी आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाहीये. घटनेची माहिती मिळताच आगराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दिलीप काकडे यांच्यावर कर्जाच डोंगर होता का  तसेच त्यांनी आर्थिक स्थिती ठासळली म्हणून आपली जीवन यात्रा संपवली, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही आहे.

कालच महागाई भत्ता वाढीची घोषणा

कालच एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे मान्य करण्यात आले आहे. परिवहनमंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष अँड अनिल परब यांनी घोषणा केली. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कामगारांनाही 28 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 28 टक्के करण्यात आला आहे. याआधी या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता दिला जात होता. याशिवाय याशिवाय घरभाडे भत्ता 8 टक्के, 16 टक्के आणि 24 टक्के असा करण्याची मागणी अनिल परब यांनी मान्य केली. या आधी हा भत्ता 7 टक्के, 14 टक्के आणि 21 टक्के असा मिळत होता.

 संगमनेरमध्ये चालकाची बसमध्ये आत्महत्या

गेल्या महिन्यात 21 सप्टेंबर रोजी अहमदमगरमध्येच एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. अहमदनगरमधील संगमनेर बस डेपोमध्ये (Sangamner bus depot) हा प्रकार घडला होता. या घटनेने एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली होती. मृतक बस चालकाचे नाव सुभाष तेलोरे असे होते.

एसटी बसचे चालक सुभाष तेलोरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बस डेपो येथे एसटी बसमध्येच गळफास घेत आयुष्य संपवले होते. पहाटेच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला होता. पाथर्डी - नाशिक या बसचे ते चालक होते. संगमनेर बसस्थानकात डिझेल नसल्याने नाशिकला न जाता संगमनेरला बस मुक्कामी होती. त्यावेळी पहाटेच्या सुमारास त्यांनी कपड्याच्या सहाय्याने बसमध्ये गळफास घेतला.

धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

गेल्या ऑगस्ट महिन्यात धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. एसटी चालक कमलेश बेडसे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर परिसरात खळबळ उडाली होती. अनियमित पगारामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आंदोलनही केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी