अहमदनगर : मुस्लीम समाजाचे प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या नुपूर शर्मा हिला अटक करण्यात यावी या मागणीसाठी मुस्लीम समाजाच्या वतीने नुपूर शर्मा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
अहमदनगर शहरात प्रतीकात्मक पुतळ्याला चपलाचा हार घालून पुतळ्याचे दहन करण्यात आले दरम्यान विना परवानगी आंदोलन करण्यात आल्याने पोलिसांनी आंदोलनकर्ताना ताब्यात घेतले होते.
एका टीव्ही डिबेटमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी मुस्लीम धर्माचे प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या जीवनाबाबत अपशब्द वापरले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर कतार, ओमान, सौदी अरेबिया सह अन्य इस्लामिक देशांनी नुपूर शर्माच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला होता.
मात्र त्यांच्या वक्तव्यानंतर शर्मावर अटकेची कारवाई न करता भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना फ़क्त पदावरुन निलंबित करण्यात आले. त्याचा निषेध म्हणून आज मुस्लीम समाजाच्या वतीने नुपूर शर्माच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचे दहन करण्यात आले.