सत्ताधारी शिवसेनेने देखील वाजविला DJ;कोरोनाचे नियम पायदळी तुडवत विसर्जन मिरवणुकीत धिंगाणा.!

नगर
उमेर सय्यद
Updated Sep 20, 2021 | 17:58 IST

 राज्य सरकारने दिलेल्या कोविड-१९ निर्देशांचे उल्लंघन करत गणेश विसर्जनच्या रात्री शहरातील अनेक मंडळांनी ध्वनि प्रदुषण नियंत्रणाची पायमल्ली केली.

The ruling Shiv Sena also played DJ; Dhingana in the immersion procession trampling on the rules of corona.!
सत्ताधारी शिवसेनेने देखील वाजविला DJ;कोरोनाचे नियम पायदळी तुडवत विसर्जन मिरवणुकीत धिंगाणा.! 
थोडं पण कामाचं
  •  राज्य सरकारने दिलेल्या कोविड-१९ निर्देशांचे उल्लंघन करत गणेश विसर्जनच्या रात्री शहरातील अनेक मंडळांनी ध्वनि प्रदुषण नियंत्रणाची पायमल्ली केली.
  • सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील DJ च्या तालावर ठेका धरल्याचे पहायला मिळाले.
  • एकीकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कधी पत्रकार परिषदा तर कधी समाज माध्यमांवर लाइव्ह येऊन संपूर्ण  महाराष्ट्राला कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन  करतात

अहमदनगर :  राज्य सरकारने दिलेल्या कोविड-१९ निर्देशांचे उल्लंघन करत गणेश विसर्जनच्या रात्री शहरातील अनेक मंडळांनी ध्वनि प्रदुषण नियंत्रणाची पायमल्ली केली. हे सहाजिक असले तरी, सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील DJ च्या तालावर ठेका धरल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे, एकीकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कधी पत्रकार परिषदा तर कधी समाज माध्यमांवर लाइव्ह येऊन संपूर्ण  महाराष्ट्राला कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन  करतात आणि दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते तथा शिवसैनिक कोरोनाचे नियम पायदळी तुडवत DJ च्या तालावर ठेका धरत असल्याचे चित्र नगरमध्ये पाहायला मिळाले.  एक ते दीड हजार नागरिकांची तोबा गर्दी असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवसैनिकांनी असे करणे कितपत योग्य आहे.? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. आता सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार का ? हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. (The ruling Shiv Sena also played DJ; Dhingana in the immersion procession trampling on the rules of corona.!)

कोरोनासारख्या महामारीमुळे अनेकांचे घरे उध्वस्त झाली आहेत. तर अनेकांनी आपले जिवलग मित्र गमावले आहेत. येणाऱ्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची  शक्यता असल्याची माहिती खुद्द महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तसेच संबधित तज्ञ देत आहेत. अश्या परिस्थिती धार्मिक सण उत्सव साध्या पध्दतीने आणि दिलेल्या निर्देशाप्रमाणे साजरा करण्याचे आदेश दिलेले असतांना देखील अहमदनगर शहरात सरकारच्या निर्देशांना पायदळी तुडविल्याचे पहायला मिळाले आहे.
 
गणपती विसर्जनाच्या रात्री अहमदनगर शहर आणि उपनगरात एक ना अनेक मंडळानीं जागेवरच DJ वाद्य लावत एकच गर्दी करून DJ च्या तालावर थरकत कोरोना नियमांना पायदळी तुडविण्याचा प्रकार घडला आहे. एवढ्यावर न थांबता चक्क सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील DJ लावत हजारावर कार्यकर्त्यांची एकच गर्दी जमा केली होती. दरम्यान राज्य सरकारच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पोलिस प्रशासन कारवाई करणार का? हाच प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी