Farmer Couple Murder : अहमदनगर : कोपरगाव तालुक्यात महिनाभरापुर्वी विहिरीच्या कामानिमित्त आलेल्या तिघांनी शेतकरी असलेल्या वृध्द दाम्पत्याच्या घराची रेकी करून महिन्याभरा नंतर राहत्या घरीच त्यांचा खून करून दरोडा टाकला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खून करणाऱ्या तिघा आरोपींना अटक केली आहे.
अजय काळे, अमित चव्हाण आणि जतेश काळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. कोपरगाव येथे शेतकरी असलेले राधाबाई भुजाडे व दत्तात्रय भुजाडे यांच्या मालकीच्या असलेल्या विहिरीच्या कामानिमित्त एका मुकादमाकड़े हे तिघे आरोपी कामाला आले होते. शेतीत विहिरीचे काम करत असतांना भुजाडे दाम्पत्याशी जवळीक साधत आरोपींनी घराची रेकी केली होती.
दरम्यान शेतीमधल्या वीहिरीचे काम हे महिनाभर सुरू असल्याने या कारागीरांना भुजाडे हे सोमवारी आठवडा बाजाराच्या दिवशी बँकेतून पैसे आणून त्यांचा पगार देत असे. त्यामुळे भुजाडे दाम्पत्य हे घरात एकटे राहत असल्याचे आणि त्यांच्याकड़े भरपूर पैसे असल्याचे आरोपींच्या लक्षात आले होते.
त्यानूसार आरोपींनी शेतीच्या विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच तब्बल एक महिन्यानंतर सोमवारच्याच दिवशी भुजाडे दाम्पत्याच्या घरी दरोडा टाकून भुजाडे दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या केली. मात्र हत्येच्या अवघ्या काही दिवसातच स्थानिक गुन्हे शाखा आणी कोपरगाव पोलिसांनी हत्या करणाऱ्या तिघा आरोपींना शिताफीने अटक केली आहे.