तृप्ती देसाई इंदुरीकर महाराजांविरोधात उचलणार मोठं पाऊल

नगर
Updated Feb 18, 2020 | 11:33 IST

इंदुरीकर महाराज अंधश्रद्धा पसरवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी तृप्ती देईसाई यांनी केली आहे. 

trupti desai criticize to indurikar maharaj and demand that fir be prosecuted
तृप्ती देसाई इंदुरीकर महाराजांविरोधात उचलणार मोठं पाऊल  |  फोटो सौजन्य: Facebook

अहमदनगर: हभप इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता याप्रकरणी आणखी वाद चिघळण्याची शक्यता आहे. कारण भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या इंदुरीकर महाराजांविरोधात आता मोठं पाऊल उचलणार आहे. इंदुरीकरांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी त्या अहमदनगरमध्ये पोलीस अधिक्षकांना भेटून त्यासंबंधी निवेदन देणार आहे. याचवेळी त्या इंदुरीकरांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे. 'इंदुरीकर हे सतत स्त्रियांचा अपमान करतात, अंधश्रद्धा पसरवत आहे. एक लक्षात घ्यावं आपला देश संविधानावर चालतो. ग्रंथांवर नाही.' अशी टीका तृप्ती देसाई यांनी दिली आहे. 

एकीकडे तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होण्याची भूमिका घेतल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी थेट तृप्ती देसाई यांनी धमकीच दिली आहे. 'तृप्ती देसाई यांनी नगरमध्ये येऊन दाखवावंच, तिची लायकी काय आहे ते मी दाखवून देईल.' अशा शब्दात त्यांनी तृप्ती देसाई यांना आव्हान दिलं आहे. 

दुसरीकडे महाराजांवर PCPNDT च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं केली. अॅड. रंजना पगार-गवांदे यांनी अहमदनगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना अर्ज करुन ही मागणी केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या लेटरहेडवर हा अर्ज करण्यात आला. PCPNDT च्या कायद्यातील कलम 22 चं उल्लंघन असं वक्तव्य करुन इंदुरीकर महाराजांनी केल्याचं या पत्रात म्हटलं गेलं आहे.   

दरम्यान, या सगळ्या प्रकरणाबाबत इंदुरीकर महाराजांनी अतिशय उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादामुळे आपण व्यथीत झालो आहोत असे त्यांनी म्हटले आहे. बीडच्या कढा येथे कुंभारवाडीत इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा उद्वीग्न झाल्याचं पाहायला मिळाले. सर्वजण विचारतायत की एवढं काय झालं. पण, सध्या माझे दिवस वाईट सुरू आहेत. चांगलं काम करूनही एवढा त्रास सहन करावा लागत आहे, असं ते म्हणाले आहेत. महाराज गावात आले तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते.  तसेच गावकऱ्यांनी महाराजांच्या समर्थनाचे पोस्टर हातात घेतले होते. लोटांगण घालतो पण आता बास्स करा अशी उद्विग्न प्रतिक्रिया हभप इंदुरीकर महाराजांनी  पिंपरीतील मोशीत झालेल्या कीर्तनात म्हटले आहे. 

इंदुरीकर महाराजांनी आपल्या समर्थकांना एक पत्र पाठवले आहे. यात ते म्हणाले, वारकरी संप्रदाय हा शांतता प्रिय कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कोणतेही आंदोलन करू नये, असे पत्रात इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...