हा तर राष्ट्रवादी महिला आयोग, तृप्ती देसाईंची खोचक टीका

नगर
रोहन जुवेकर
Updated May 18, 2022 | 16:48 IST

Trupti Desai Slams Ncp And Maharashtra Government Over Ketaki Chitale Issue : एखाद्या महिलेचे चारित्र्य हनन होतंय किंवा तिला त्रास होतोय म्हणून राज्य महिला आयोगाला जाग आली नाही. 

Trupti Desai Slams Ncp And Maharashtra Government
हा तर राष्ट्रवादी महिला आयोग, तृप्ती देसाईंची खोचक टीका 
थोडं पण कामाचं
  • हा तर राष्ट्रवादी महिला आयोग
  • तृप्ती देसाईंची खोचक टीका
  • महिलेचे चारित्र्य हनन होतंय किंवा तिला त्रास होतोय म्हणून राज्य महिला आयोगाला जाग आली नाही

Trupti Desai Slams Ncp And Maharashtra Government Over Ketaki Chitale Issue : नगर : कारवाई करताना भेदाभेद होतो. पीडित महिला सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर आरोप करतात त्या प्रकरणी कारवाईत टाळाटाळ करण्यात येते किंवा चालढकल केली जाते. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर एखाद्या पीडित महिलेने तक्रार केल्यास त्यांच्यावर मात्र तातडीने कारवाई होते. केतकी चितळेचे प्रकरण समोर आले तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनीही आक्षेपार्ह पोस्ट केल्या. पण एखाद्या महिलेचे चारित्र्य हनन होतंय किंवा तिला त्रास होतोय म्हणून राज्य महिला आयोगाला जाग आली नाही. 

केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Ketaki Chitale : केतकीने शरद पवारांचा उल्लेख केलेलाच नाही, तृप्ती देसाई यांनी घेतली बाजू

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यास मारहाण होताच वेगाने पोलीस कारवाई झाली.  राज्य महिला आयोग काम करत असताना विशिष्ट पक्षाच्या बाबतीत बोटचेपी भूमिका घेण्यात येत असेल, तर मग रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाचे काम करत नाहीत. त्या अपयशी ठरत आहेत, असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला.

महिला सबलीकरण, बलात्कार कमी कसे होतील यासाठी महिलांची जनजागृती, युवकांची मनोवृत्ती बदलण्यासाठी गावोगावी मेळावे आवश्यक आहेत. पण तसे होत नाही. व्यक्ती आणि पक्ष पाहून कारवाई होते. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत महिला आयोगाचे रुपांतर राष्ट्रवादी महिला आयोगात करून कायद्याने त्याला मंजुरी द्या अशी विनंती करत तृप्ती देसाई यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. 

राज्य महिला आयोगाच्या पदावर आल्यापासून २४ तासांत रिपोर्ट द्या, फक्त बैठका घेणं किंवा महिला कक्षाची अचानक जाऊन पाहणी करायची, हे स्टंटबाजी रुपाली चाकणकरांनी बंद करावी. तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात, तुम्ही आदेश देऊ शकात, हे सगळं बदलू शकता, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

शरद पवारांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीकडे फक्त एक महिना राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद द्यावं, ही विनंती आहे. कायदा काय असतो, महिला आयोगाला काय अधिकार आहेत आणि कायद्यानुसार कसे धाबेदणाणतात हे मी दाखवून देईन. महिला सक्षमीकरण कसं झालं पाहिजे आणि समान वागणूक कशी दिली जाते, हे मी दाखवून देऊ शकते, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी