Amit Shah on Cooperate : अहमदनगर : गेल्या ७५ वर्षात कुणालाही सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा विचार केला नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरदर्शीपणे निर्णय घेऊन सहकार मंत्रालय स्थापन केले असे मत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. तसेच, सहकारी बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले कसे असा सवाल उपस्थित करून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. अहमदनगरमधील सहकार परिषद आणि कृषी संम्मेलनात ते बोलत होते. (union cooperate minister amit shah criticized maharashtra government over cooperate bank scam)
शहा म्हणाले की, याच ठिकाणी सहकारितेचे बिगूल वाजले आणि ही सहकारी चळवळ संपूर्ण देशात पसरली, सहकारासंबंधित लोकांनी या पवित्र भुमीवर येऊन आशिर्वाद घ्यावे असे आवाहन शहा यांनी केले. तसेच गुजरातमध्येही अमूल सारखी चळवळ उभी राहिली आणि यशस्वी झाली. आज अमूल उद्योगाचा व्यवसाय ५० हजार कोटी रुपयांचा आहे असेही शहा म्हणाले.
सहकारी चळळवळीतील दोष दूर केले पाहिजे, एक वेळ होती तेव्हा महाराष्ट्रात अनेक सहकारी बँका होत्या. पण आज राज्यात केवळ तीनच सहकारी बँका उरल्या आहेत. या सहकारी बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे कसे झाले? याला आरबीआय दोषी आहे का? तर नाही, आरबीयाने असे काही केले नाही. मी आज कुठलीही राजकीय टीका करायला आलो नाही. सहकारी चळवळीतील लोकांसोबत केंद्र सरकार ठाम पणे उभे आहे असे अमित शहा यावेळी म्हणाले.