'केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर फॉल्टी', राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा भाजपावर गंभीर आरोप 

नगर
उमेर सय्यद
Updated Jul 06, 2020 | 17:16 IST

Rohit Pawar: केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला दिलेले व्हेंटिलेटर हे फॉल्टी असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. 

Rohit Pawar
रोहित पवार  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आमदार रोहित पवार यांनी साधला भाजपवर निशाणा
  • भाजपच्या केंद्र सरकारने राज्याला फॉल्टी व्हेंटिलेटर दिल्याचा रोहित पवार यांचा आरोप
  • राज्य सरकारच्या कार खरेदीवरुन भाजपने केली होती टीका

अहमदनगर: भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने (Bjp Central Govt) महाराष्ट्र राज्याला मदत म्हणून दिलेले व्हेंटिलेटर हे फॉल्टी असल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे ते अहमदनगर मध्ये बोलत होते.

कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी राज्य सरकारवर कर्ज घेण्याची वेळ आली आहे. मात्र शिक्षणमंत्री, क्रीडा मंत्र्यांच्या गाड्या खरेदीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल १ कोटी ३७ लाख रुपये मंजूर केले आहेत. जनतेचे सेवक असल्याचा दावा करत सत्ता स्थापन करणार्या उद्धव ठाकरे यांच्याकडून मंत्र्यांवर उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने राज्यातील ठाकरे सरकारवर केला होता 

त्यावर स्पष्टीकरण देताना आमदार रोहित पवार यांनी थेट केंद्र सरकारवरच निशाणा साधला आहे. 'संपूर्ण गाड्याचा खर्च हा ५० लाख ते १ कोटी पर्यंत असेल मात्र हा काही राज्याचा किंवा देशाचा मुद्दा नाही. मात्र अशा परिस्थितीत देखील भाजपा राजकारण करत असेल तर मागच्या पाच वर्षात त्यांनी काय-काय केले हे सगळ्यांनी बाहेर काढले आहे आणि आम्ही देखील ते बाहेर काढू शकतो.' 

'विशेष म्हणजे केंद्रातील भाजपा सरकारने राज्याला मदत म्हणून दिलेले व्हेंटिलेटर आउटपूटच चुकीचा दाखवत आहे. त्यांनी दिलेले व्हेंटिलेटर हे फॉल्टी आहेत. यावर फडणवीस आवाज उठविणार का? आता ते प्रत्येक हॉस्पिटलला भेट देत आहेत. आता ते या मुद्दावर प्रश्न उपस्थित करणारं का?' असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. 

सरकारच्या कार खरेदीवर विरोधकांची टीका 

महाराष्ट्र सरकारने राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मंत्र्यांसाठी पाच नव्या कार आणि एक कार स्टाफसाठी खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण मंत्रयांसाठी कार्यालयीन वापरासाठी नवी इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) कार खरेदी कऱण्यात येणार आहे आणि या कारची किंमत जवळपास २३ लाख रुपये इतकी आहे. 

महाराष्ट्र सरकार आर्थिक संकटात असताना सहा नव्या कार खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. विधानपरिषदेचे विरोधी पक्षेते प्रविण दरेकर यांनी ट्वीट करत टीका केली होती. 

नव्या कार खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली असून या संदर्भात शासन निर्णय काढण्यात आला आहे. यामध्ये म्हटलं आहे की, "शालेय शिक्षण मंत्री यांच्या वापराकरिता खरेदी करावयाच्या नवीन वाहनाची किंमत २२.८३ लाख म्हणजेच २० लाखांपेक्षा अधिक असल्याने एक विशेष बाब म्हणून वाहन खरेदी करण्यास वित्त विभागाच्या राज्यस्तरीय वाहन आढावा समितीने तसेच मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे".

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी