[Video] सिने स्टाईल पाठलाग करून लाखोंची विदेशी दारू जप्त

नगर
Updated Oct 15, 2019 | 22:06 IST | ऊमेर सय्यद

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर - पुणे महामार्गावरील कामरगाव घाटात एका आयशर कंपनीच्या ट्रकचा सिने स्टाईल पाठलाग करून त्या ट्रक मधून 18 लाख 48 हजार रुपयांची दमण निर्मित विदेशी दारू जप्त केली आहे.

vidhansabha election 2019 liquor stock sized in ahmadnagar  news in marathi
सिने स्टाईल पाठलाग करून लाखोंची विदेशी दारू जप्त  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर - पुणे महामार्गावरील कामरगाव घाटात एका आयशर कंपनीच्या ट्रकचा सिने स्टाईल पाठलाग करून त्या ट्रक मधून 18 लाख 48 हजार रुपयांची दमण निर्मित विदेशी दारू उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी जप्त करत कारवाई केली आहे. यामध्ये एका आरोपीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर संपूर्ण महाराष्ट्रमध्ये दारूचा अवैध व्यवसाय बंद असताना देखील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर - पुणे महामार्गावरील कामरगाव घाटात एका आयशर कंपनीच्या GJ.1.HT1262 क्रमांकाच्या ट्रकचा सिने स्टाईल पाठलाग करत ही कारवाई करण्यात आली आहे 

यामध्ये दमण निर्मित किंगफिशर, माँकडॉल, ऑफिसर चॉईस, रॉयल स्पेशल अश्या नामांकित दारूचा साठा आढळून आला आहे.  मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 ,66,80 (1)83,98,(2) नुसार हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे 

दरम्यान ही कारवाई अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क अ विभाग ब विभाग अहमदनगर आणि विभागिय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे यांच्या वतीने करण्यात आली आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...