Maharashtra Farmers : अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देऊ : मुख्यमंत्री

नगर
रोहन जुवेकर
Updated Mar 18, 2023 | 17:59 IST

we will compensate the farmers who suffered due to bad weather says chief minister eknath shinde : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

we will compensate the farmers who suffered due to bad weather says CM
अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देऊ : मुख्यमंत्री  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देऊ : मुख्यमंत्री
  • राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना नजरेसमोर ठेवून योजना
  • गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत भरघोस तरतूद

we will compensate the farmers who suffered due to bad weather says chief minister eknath shinde : महाराष्ट्रात सत्तेत असलेले सरकार शेतक-यांचे, सर्वसामान्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालणारे आहे. शेतक-यांनी घाबरून जाऊ नये. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना नजरेसमोर ठेवून योजना आखल्या आहेत. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत भरघोस तरतूद केली आहेत. उसतोड कामगारांच्या मुलांसाठी प्रमुख शहरांमध्ये वसतीगृह उभारण्यात येतील. उसतोड कामगार महामंडळास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

याआधी महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पालकमंत्री दादाजी भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रितम मुंडे, खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, देवयानी फरांदे, मोनिका राजळे, सुहास कांदे, हिरामण खोसकर आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. गोपीनाथ मुंडे यांनी अठरापगड जातीसाठी काम केले. या कार्यामुळेच ते लोकनेते झाले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंडे स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कल्याणकारी योजना राबवाव्या लागतील, असे गडकरी म्हणाले. शेतकरी अन्नदाताबरोबरच उर्जा दाता बनला पाहिजेत. स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट व्हिलेज ही संकल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे, असेही गडकरी म्हणाले. तर नगर जिल्ह्यात गोपीनाथ गडाची निर्मिती करणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ उसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृह, औरंगाबाद येथे दवाखाना उभारा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

Coconut Water : नारळ पाणी पिण्याचे फायदे

प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करताना घ्यायची काळजी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी