भररस्त्यात तरुणीची छेडछाड, अहमदनगरमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

नगर
Updated Sep 12, 2019 | 21:33 IST | ऊमेर सय्यद

Caught on Camera: रस्त्यावरुन चालत जाणाऱ्या एका तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

youth molest girl in ahmednagar, incident caught in cctv
भररस्त्यात तरुणीची छेडछाड, अहमदनगरमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद 

थोडं पण कामाचं

  • तरुणीसोबत भरदिवसा छेडछाड
  • अहमदनगरमधील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
  • आरोपी तरुणाला नागरिकांनी पकडून चांगलाच चोपला
  • आरोपी तरुण पोलिसांच्या ताब्यात, अधिक तपास सुरू

अहमदनगर: महिलांवर होणारे अत्याचार काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता अहमदनगरमध्ये एका तरुणीची भरदिवसा छेडकाढल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पीडित तरुणी महाविद्यालयातून आपल्या घराच्या दिशेने जात होती त्यावेळी आरोपीने तिच्यासोबत गैरवर्तन केलं. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात ही घटना घडली आहे.

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात महाविद्यालयीन मुलींसोबत छेडछाडीचे प्रमाण दिवसेदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. श्रीरामपूर शहरात आपल्या महाविद्यालयातून घरी जात असताना अचानक रस्त्यांवर एका बेरड नामक व्यक्तीने संबंधित युवतीशी अश्लील वर्तन करून तिच्यासोबत छेडछाड केली. तरुणीची छेड काढल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र, नागरिकांना त्याला पकडून बेदम चोप दिला.

तरुणीची छेड काढून तेथून पळ काढणाऱ्या बेरड याला स्थानिक नागरिकांनी पकडलं आणि बेदम मारलं. त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. आरोपीने तरुणीची छेड काढली त्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद झाली आहे.

छेडछाड करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र इज्जतीच्या भीती पोटी त्या युवतीने अद्यापही पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाहीये. अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये महाविद्यालयीन युवतींसोबत छेडछाडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. या प्रकरणी पोलीस प्रशासन कारवाई कधी करणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...