जिल्हा परिषद पराभव भाजपच्या जिव्हारी, रोहित पवारांची आयटी धाडीवर टीका

नगर
उमेर सय्यद
Updated Oct 07, 2021 | 16:21 IST

Rohit Pawar । जिल्हा परिषदाच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आणि लगेच अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी इन्कम टॅक्सची धाड पडावी, हा निव्वळ योगायोग आहे का

Zilla Parishad defeat BJP shocks, Rohit Pawar's criticism on IT raids
जिल्हा परिषद पराभव भाजपच्या जिव्हारी: रोहित पवार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जिल्हा परिषदाच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले
  • आणि लगेच अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी इन्कम टॅक्सची धाड पडावी,
  • हा निव्वळ योगायोग आहे का अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

Rohit Pawar ।  जिल्हा परिषदाच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आणि लगेच अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी इन्कम टॅक्सची धाड पडावी, हा निव्वळ योगायोग आहे का, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. 

आयटीच्या कारवाईबद्दल मला जास्त माहिती नाही असे म्हणत रोहित पवार म्हणाले, इन्कम टॅक्सच्या धाडी आणि कालच्या निवडणूक निकालांचा काही संबंध आहे का हे थोडंस आपल्याला पाहावं लागले. तर राजकीय हेतुतून असे प्रकार होत असतील तर लोकंही या गोष्टींना कंटाळले आहेत. अशा प्रकारची वागणूक योग्य नाही असे माझ्यासोबत सर्वसामान्य माणसांचे म्हणणे असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी