Video | अहमदनगरमध्ये एकाच वेळी 22 जणांचा दिला अग्नी, काल एकूण ४२ अत्यंसंस्कार 

नगर
Updated Apr 09, 2021 | 13:46 IST

22 Corona Patient Funeral ।कोरोना विषाणूची दुसरी लाट खूप भयंकर रुप धारण करत आहे.  कोरोना विषाणू झपाट्याने पसरत असून मोठ्या प्रमाणात लोकांना त्याची बाधा होत आहे

थोडं पण कामाचं

  • कोरोना विषाणूची दुसरी लाट खूप भयंकर रुप धारण करत आहे.  
  • कोरोना विषाणू झपाट्याने पसरत असून मोठ्या प्रमाणात लोकांना त्याची बाधा होत आहे
  •  दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आंबाजोगाईमध्ये एका सरणावर 8 जणांवर अंत्यंसस्कार केल्याचे समोर होते

22 Corona Patient Funeral । अहमदनगर : कोरोना विषाणूची दुसरी लाट खूप भयंकर रुप धारण करत आहे.  कोरोना विषाणू झपाट्याने पसरत असून मोठ्या प्रमाणात लोकांना त्याची बाधा होत आहे.  दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आंबाजोगाईमध्ये एका सरणावर 8 जणांवर अंत्यंसस्कार केल्याचे समोर आल्यानंतर आता एकाच वेळी २२ जणांवर अत्यंसंस्कार होत असल्याचा धक्कादायक प्रकार  अहमदनगरमध्ये (Ahmednagar Corona News) समोर आला आहे. अहमदनगरच्या अमरधाममध्ये (Amar Dham) एकाच वेळी 22 जणांवर अंत्यसंस्कार (22 Corona Patient Funeral) करावे लागले आहेत. तर, याच ठिकाणी दिवसभरात एकूण 42 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (  22 dead bodies funeral done at one time in Ahmednagar )

22 जणांचे सरणावर अंत्यसंस्कार  

अहमदनगर येथील अमरधाममध्ये हृदय पिळवटून टाकणारे चित्र समोर आलं असून अमरधाम मध्ये सरणावर एकाचवेळी 22 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. विद्युत दाहिनीत दिवसभरात 20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवसभरात एकूण तब्बल 42 जणांवर अंत्यसंस्कार झाल्याच समोर आलंय.

अमरधाममधील व्हिडिओ

 


 

6 मृतदेह एकाच वेळी नेण्याची नामुष्की

अहमदनगर महापालिकेसमोर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचं आव्हानं उभं राहिलं होतं. शववाहिनीतून एकाचवेळी सहा मृतदेह भरून अमरधाममध्ये नेण्याची नामुष्की महानगरपालिकेवर ओढावलीय. या संदर्भात माहिती घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी