Shirdi Saibaba Donation : साईच्या चरणी कोट्यवधींचे दान; रोख रक्कमसह सोने चांदीच्या दागिन्यांचाही समावेश 

नगर
Updated Nov 24, 2022 | 22:06 IST

Shirdi Donation : कोरोना संकटानंतर कोट्यवधी भक्तांनी शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन घेतले आहे. भक्तांनी बाबाचे दर्शन घेतल्यानंतर साईच्या चरणी कोट्यवधीचे दान टाकले आहे. गेल्या १३ महिन्यांत भक्तंनी साईचरणी ३९८ कोटी रुपये साईबाबाला अर्पण केले आहे. शिर्डीच्या साई संस्थानने याबाबत माहिती दिली आहे.

थोडं पण कामाचं
  • कोरोना संकटानंतर कोट्यवधी भक्तांनी शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन घेतले आहे.
  • भक्तांनी बाबाचे दर्शन घेतल्यानंतर साईच्या चरणी कोट्यवधीचे दान टाकले आहे.
  • गेल्या १३ महिन्यांत भक्तंनी साईचरणी ३९८ कोटी रुपये साईबाबाला अर्पण केले आहे.

Shirdi Donation : शिर्डी : कोरोना संकटानंतर कोट्यवधी भक्तांनी शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन घेतले आहे. भक्तांनी बाबाचे दर्शन घेतल्यानंतर साईच्या चरणी कोट्यवधीचे दान टाकले आहे. गेल्या १३ महिन्यांत भक्तंनी साईचरणी ३९८ कोटी रुपये साईबाबाला अर्पण केले आहे. शिर्डीच्या साई संस्थानने याबाबत माहिती दिली आहे. (393 crore donation to shirdi saibaba in last 13 months)

कोरोनाचे संकट आटोक्यात आल्यानंतर ७ ऑक्टोबर २०२१ पासून शिर्डीचा साई दरबार सामान्य भक्तांसाठी पुन्हा सुरू झाला. त्या दिवसांपासून म्हणजे ७ ऑक्टोबर २०२१ ते २० नोव्हेंबर २०२२ या काळात अडीच कोटी भाविकांनी साईबाबाचे दर्शन घेतले आहे.  या भक्तांनी साईचरणी मनापासून दान केले आहे. आतापर्यंत साईचरणी ३९८ कोटी रुपयांचे दान आले आहे. ही रक्कम फक्त रोख स्वरुपात नसून त्यात चेक, डीडी, सोने चांदी, हिरे आणि ऑनलाईन दानाचाही समावेश आहे. 


साई बाबांच्या शिर्डीची अर्थव्यवस्था ही साई बाबांच्या मंदिरावर अवलंबून आहे. मात्र कोविड काळात मंदिरे बंद असल्याने शिर्डीची अर्थव्यवस्था कोलमडून पडली होती. तसेच बाबांवर श्रद्धा असलेल्या भाविकांना देखील कोविड काळात दर्शन व्यवस्था बंद असल्याने दर्शन घेता आले नव्हते. ऑक्टोबरला मंदिराची दारे उघडताच १३ महिन्यातच चक्क अडीच कोटी भाविकांनी बाबांचे दर्शन घेतले आहे. तर बाबांच्या झोळीत भरभरून दान देखील केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी