[VIDEO] एसटी बसला भीषण अपघात, बस जळून खाक, २८ प्रवासी जखमी

नगर
Updated Jul 09, 2019 | 16:10 IST | ऊमेर सय्यद

अहमदनगर इथं एक भीषण अपघात घडलाय. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अपघातात २८ प्रवासी जखमी झाले आहेत. जाणून घ्या या अपघाताबाबत...

Bus Accident
अहमदनगर इथे बसचा भीषण अपघात  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • अहमदनगरला बस-ट्रकचा भीषण अपघात
  • बसमधील २१ प्रवासी किरकोळ, तर ७ प्रवासी गंभीर जखमी
  • अपघातानंतर बसनं पेट घेतला, बस जळून खाक

अहमदनगर: शहरातील औरंगाबाद रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहासमोर एसटी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात २८ प्रवासी जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर एसटी बसनं पेट घेतला आणि संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र सुदैवानं सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे मोठी हानी टळली.

सोमवारी मध्यरात्रीनंतर दीड ते दोनच्या सुमारास बस आणि ट्रकमध्ये अपघात झाला. या अपघातात २३ प्रवासी जखमी झाले आहेत. तर एसटी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. ही बस औरंगाबादहून पुण्याला जात होती. त्याचेवळी अहमदनगरहून एक ट्रक औरंगाबादच्या दिशेनं जात होता. ट्रकनं बसला समोरून धडक दिली. ट्रकची धडक एव्हढी जोरात होती की परिसरात मोठा आवाज झाला. बसमधील सर्व प्रवासी तेव्हा झोपेत होते. त्यामुळे नेमकं काय झालं हे प्रवाशांना कळलं देखील नाही.

मात्र अपघात होताच सर्व प्रवाशांना गाडीतून खाली उतरवलं गेलं. ड्रायव्हरच्या मागच्या सीटवरील प्रवासी जास्त जखमी झालेले आहेत. प्रवासी खाली उतरताच एसटीनं अचानक पेट घेतला आणि एसटी पूर्णपणे जळून खाक झाली. त्यामुळे सुदैवानंच मोठी जीवितहानी टळली.

एसटी बसमधील सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. २१ प्रवासी किरकोळ जखमी असून ७ प्रवाशांची स्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. गंभीर जखमींमध्ये एसटी बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा समावेश आहे.

गंभीर जखमी प्रवाशांची नावं खालील प्रमाणे आहेत...

अनिल कुंडलिक साबळे (वय २५, चिखली बुलढाणा), उमेश गणेश बोऱ्हाडे (सिल्लोड, औरंगाबाद), रफिक नबीलाल पठाण (एसटी चालक, उस्मानाबाद), प्रशांत अर्जुन चौधरी (चाळीसगाव जळगाव), उल्केश प्रकाश झगडे (चाळीसगाव), सौरभ बापू शिंपी (चाळीसगाव), जानेश्वर सुभाष काटे (औरंगाबाद).

दरम्यान, अशीच एक धक्कादायक घटना सोमवारी उत्तर प्रदेशच्या आग्र्याजवळ घडली होती. हा बस अपघात इतका भीषण होता की त्यात २९ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेशच्या रोडवेजची डबल डेकर बस लखनऊ इथून दिल्लीच्या दिशेनं जात होती. यावेळी आग्राजवळ यमुना एक्सप्रेसवेवर ही बस नाल्यात कोसळली.

यमुना एक्सप्रेस वेवर अनेकदा दुर्घटना होत असतात. या वर्षी मार्च महिन्यात एका खासगी बसला झालेल्या अपघातात आठ लोकांचा मृत्यू झाला. त्या बसनं ट्रकला टक्कर दिली होती. यात २० जण जखमी झाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[VIDEO] एसटी बसला भीषण अपघात, बस जळून खाक, २८ प्रवासी जखमी Description: अहमदनगर इथं एक भीषण अपघात घडलाय. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अपघातात २८ प्रवासी जखमी झाले आहेत. जाणून घ्या या अपघाताबाबत...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांची अवघ्या 20 दिवसात घरवापसी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांची अवघ्या 20 दिवसात घरवापसी
[Video] राज ठाकरेंनी 'यांना' दिली गरोदर असल्याची उपमा... त्यानंतर मैदान दणाणून सोडले... 
[Video] राज ठाकरेंनी 'यांना' दिली गरोदर असल्याची उपमा... त्यानंतर मैदान दणाणून सोडले... 
Exclusive [VIDEO] 'एकच वादा, रोहित दादा',  मंत्री राम शिंदेंच्या सभेतच घोषणाबाजी
Exclusive [VIDEO] 'एकच वादा, रोहित दादा',  मंत्री राम शिंदेंच्या सभेतच घोषणाबाजी
 उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पूत्रांना धू-धू धुतले... पाहा काय म्हणाले कणकवलीत 
उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पूत्रांना धू-धू धुतले... पाहा काय म्हणाले कणकवलीत 
 १३ वर्ष मंत्रीपद देऊनही काही करता आले नाही तर बांगड्या भरा - पवारांचा यांना टोला 
१३ वर्ष मंत्रीपद देऊनही काही करता आले नाही तर बांगड्या भरा - पवारांचा यांना टोला 
एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर होती, पण...
एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर होती, पण...
Raj Thackeray: पराभव जिव्हारी लागला, तरीही नाशिकवर प्रेमः राज ठाकरे
Raj Thackeray: पराभव जिव्हारी लागला, तरीही नाशिकवर प्रेमः राज ठाकरे
PM Modi: 2022 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचा संकल्प, मोदींकडून परळीकरांसाठी भरघोस योजना
PM Modi: 2022 पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचवण्याचा संकल्प, मोदींकडून परळीकरांसाठी भरघोस योजना