जनतेच्या प्रश्नासाठी रूटिंग भेट होतं असते?  यात वेगळी चर्चा नको, पवार-शहा भेटीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया 

नगर
Updated Apr 01, 2021 | 15:59 IST

Sharad Pawar-Amit Shah meeting : शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झालेली नाही, मात्र जर भेट झाली असेल तर ती रूटिंग भेट असू शकते.

थोडं पण कामाचं

  • शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झालेली नाही, मात्र जर भेट झाली असेल तर ती रूटिंग भेट असू शकते.
  • त्या दोघांची भेट झालेली नाही आणि जर झाली असेल तर वेगळी चर्चा नको
  • केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी 'सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात' असं वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापलं होतं. 

अहमदनगर : शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झालेली नाही, मात्र जर भेट झाली असेल तर ती रूटिंग भेट असू शकते. जनतेच्या प्रश्नासाठी विरोधी पक्ष हे सत्तेत बसलेल्या मंत्र्यांची भेट घेत असतात, त्यामुळे त्या दोघांची भेट झालेली नाही आणि जर झाली असेल तर वेगळी चर्चा नको, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांचे नातू तथा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. 

पश्चिम बंगाल निवडणुकीदरम्यान केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची बंद दाराआड बैठक झाल्याच्या चर्चेने महाराष्ट्रातील राजकारण चांगलच ढवळून निघाले होते. त्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी 'सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात' असं वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापलं होतं. 

यासंदर्भात महाविकास आघाडीचे नेते मंडळी हे पवार-शहा यांची भेट झालीच नसल्याच स्पष्टीकरण देत होते तर दुसरीकडे भाजपाने देखील संधीचे सोनं करत अमित शहांच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. 

आता मात्र त्यावर बोलतांना शरद पवार यांचे नातू तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. रोहित पवारांनी सांगितलं की पहिल्यापासून आमच्या नेत्यांनी पवार - शहा भेट झाली नसल्याच सांगितलं आहे.  माझ्या माहितीप्रमाणे देखील ही भेट झालेली नाही. मात्र तरी देखील भाजपा यात राजकारण करत आहे, असं सांगत पवार आणि शहांची भेट जरी झाली असेल तर ती जनतेच्या प्रश्नासाठीच असेल कारण जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी बऱ्याचवेळा विरोधी पक्षांतील नेत्यांना सत्तेत बसलेल्या नेत्यांची रुटिंग भेट घ्यावी लागते. ही भेट झाली नसून विनाकारण वेगळी चर्चा कुणी करू नये असं स्पष्टीकरण रोहित पवारांनी दिला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी