AHMEDNAGAR | शिर्डीच्या साईचरणी 36 लाखांचा सोन्याचा मुकुट; आंध्रप्रदेशातील भक्ताचे दान

नगर
Updated Aug 11, 2022 | 20:29 IST

आंध्रप्रदेश राज्‍यातील बापटला येथील दानशुर साईभक्‍त अन्‍नम सतिष प्रभाकर यांनी ७७० ग्रॅम वजनाचा ३६ लाख ९८ हजार ३१० रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट आणि ६२० ग्रॅम वजनाचे ३३ हजार ४८० रुपये किंमतीचे चांदीचे ताट श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले.

थोडं पण कामाचं
  • आंध्रप्रदेश राज्‍यातील बापटला येथील दानशूर साईभक्‍त अन्‍नम सतिष प्रभाकर यांच्याकडून दान
  • ७७० ग्रॅम वजनाचा ३६ लाख ९८ हजार ३१० रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट आणि ६२० ग्रॅम वजनाचे ३३ हजार ४८० रुपये किंमतीचे चांदीचे ताट श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले.
  • देणगी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी स्वीकारली आहे.

अहमदनगर -  आंध्रप्रदेश राज्‍यातील बापटला येथील दानशूर साईभक्‍त अन्‍नम सतिष प्रभाकर यांनी ७७० ग्रॅम वजनाचा ३६ लाख ९८ हजार ३१० रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट आणि ६२० ग्रॅम वजनाचे ३३ हजार ४८० रुपये किंमतीचे चांदीचे ताट श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले.

अधिक वाचा : ​झोपण्यापूर्वी करा हे छोटे काम, व्हाल मालामाल

ही  देणगी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी स्वीकारली आहे. आता आंध्र प्रदेशातील या भक्ताने जवळपास ३६ लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट साईचरणी अर्पण केलेला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी