Balasaheb Thorat : संभाजीराजेंच्या उमेदवारीबद्दल काँग्रेसची विनंती शिवसेनेने धुडकावली - बाळासाहेब थोरात

नगर
Updated May 28, 2022 | 18:42 IST

राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजे भोसले यांनी माघार घेतली आहे. परंतु शिवसेनेने संभाजीराजेंना उमेदवारी देऊन त्यांना निवडून द्यावे अशी विनंती काँग्रेसने केली होती. परंतु शिवसेनेने ही विनंती धुडकावून लावली अशी माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. 

थोडं पण कामाचं
  • राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजे भोसले यांनी माघार घेतली आहे.
  • परंतु शिवसेनेने संभाजीराजेंना उमेदवारी देऊन त्यांना निवडून द्यावे अशी विनंती काँग्रेसने केली होती.
  • परंतु शिवसेनेने ही विनंती धुडकावून लावली अशी माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. 

Balasaheb Thorat : अहमदनगर : राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजीराजे भोसले यांनी माघार घेतली आहे. परंतु शिवसेनेने संभाजीराजेंना उमेदवारी देऊन त्यांना निवडून द्यावे अशी विनंती काँग्रेसने केली होती. परंतु शिवसेनेने ही विनंती धुडकावून लावली अशी माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. 
अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलताता थोरात म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे छत्रपतींचे वंशज संभाजीराजे यांना उमेदवारी द्यावी अशी विनंती काँग्रेसने केली होती. परंतु ही जागा शिवसेनेच्या वाट्याची आहे, याबद्दल सर्वस्वी निर्णय त्यांनी घ्यायचा होता. आणि त्यानुसार त्यांनी तो घेतला. शिवसेनेने काँग्रेसची ही विनंती धुडकावली असेही थोरात म्हणाले.  यावर संभाजीराजे म्हणाले होते की  राज्यसभेच्या जागेवरून मुख्यमंत्री आणी माझ्यात चर्चा झाली होती. मी मुख्यमंत्री ठाकरे यांना स्पष्टपणे सांगितले होते कीं मी शिवसेनेत प्रवेश नाही तर शिवसेना पुरस्कृत ही उमेदवारी स्वीकारणार. मात्र शब्द देऊनही मुख्यमंत्र्यांनी शब्द मोडला असल्याची खंत संभाजीराजे यांनी व्यक्त केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी