अहमदनगर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने १११ फुटी तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. जामखेडच्या इतिहासामधील ही पहिली भव्य तिरंगा पदयात्रा असून यात्रा मार्गावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. या निमित्ताने देशात हर घर तिरंगा हे अभियान चालवले जात आहे. बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड पासून १११ फुट लांबीचा तिरंगा घेऊन ध्वज यात्रा सुरू झाली. या यात्रेचे जामखेडकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झालीआली. यानंतर यात्रेची सांगता जामखेड महाविदयालयाच्या परिसरात झाली.