बाप रे! राज्यातील १० मंत्री, २० आमदारांची टेस्ट पाॅझिटिव्ह; 'लगीनघाई'ने वाढवला कोरोनाचा राजकीय संसर्ग

10 ministers state 20 mla infected coronavirus : लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

10 ministers of state; Test positive of 20 MLAs, 'Laginghai' increased Corona's political contagion
बाप रे! राज्यातील १० मंत्री; २० आमदारांची टेस्ट पाॅझिटिव्ह, 'लगीनघाई'ने कोरोनाचा राजकीय संसर्ग वाढला  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • राज्यातील १० मंत्री, २० आमदार कोरोना बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे.
  • देशात ओमिक्राॅनमुळे कोरोनाची तिसरी लाट आली आहे.
  • राजकीय नेत्यांच्या मुलांच्या शाही विवाह सोहळा रंगला. 

मुंबई : २०२१ वर्षाचा शेवटी कोरोनाच्या (corona) नव्या व्हेरिएन्टने डोके वर काढले. त्यामुळे दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन काही दिवसात आटोपले. पण त्याचवेळी अनेक राजकीय नेत्यांच्या घरातील लग्नकार्य (wedding ceremony) थाटामाटात झाली. त्यामध्ये झालेल्या गर्दीत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून राज्यातील १० मंत्री (ministers), २० आमदार (mla) कोरोना बाधित (infected coronavirus) झाल्याने खळबळ उडाली आहे. (10 ministers of state; Test positive of 20 MLAs, 'Laginghai' increased Corona's political contagion)

देशात ओमिक्राॅनमुळे कोरोनाची तिसरी लाट आली आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पण डिसेंबरच्या अखेरी या रुग्णसंख्येचा विस्फोट झाला. कारण राज्यात ३१ डिसेंबर रोजी दिवसभरात 8 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा पसरला आहे. मुंबईत तब्बल 5 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत.

राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांचे शाहीविवाह सोहळे

राजकीय नेत्यांच्या मुलांच्या शाही विवाह सोहळा रंगला. यात मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत,माजी खासदार प्रफुल्ल पटेल,  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, उदयसिंह रजपूत, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा समावेश होता. यातील बहुतांश लग्नांना राज्यातील मान्यवर नेते उपस्थित राहिले. 

अनेक नेत्यांवर उपचार सुरु

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासह १० मंत्री आणि २० आमदार पाॅझिटिव्ह झाले आहेत. 

निर्बंध वाढवणार

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात #COVID रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास सरकारला आणखी निर्बंध लादावे लागतील असा इशारा दिला. नववर्षानिमित्त विविध शहरांमध्ये निर्बंध लावले होते. मात्र, लोकांनी त्याचे उल्लंघन केल्याने अनेक ठिकाणी दिसून आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी