Railway : महाराष्ट्रात ब्रॉडगेज मार्गांचे 100 टक्के विद्युतीकरण वर्षभरात होणार

100 percent electrification of broad gauge railway route in Maharashtra will be done within a year : महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या  ब्रॉडग्रेज रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण या वर्षाच्या (2023) अखेरपर्यंत  करण्यात येईल, राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.

100 percent electrification of broad gauge railway route in Maharashtra will be done within a year
महाराष्ट्रात ब्रॉडगेज मार्गांचे 100 टक्के विद्युतीकरण वर्षभरात होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात ब्रॉडगेज मार्गांचे 100 टक्के विद्युतीकरण वर्षभरात होणार
  • राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील
  • महाराष्ट्रातील ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्यांची संख्या 10 होणार

100 percent electrification of broad gauge railway route in Maharashtra will be done within a year : महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या  ब्रॉडग्रेज रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण या वर्षाच्या (2023) अखेरपर्यंत  करण्यात येईल, राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. महाराष्ट्रात सध्या 8 ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया सुरू आहेत. आता 10 फेब्रुवारीला आणखी दोन वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली.

Railway Budget 2023: रेल्वेसाठी 2.40 लाख कोटींची घोषणा; नव्या योजनांसाठी 75 हजार कोटींचा निधी, जाणून घ्या कोणते मोठे प्रकल्प आहेत सुरू

भारतात लवकरच 400 ‘वंदे भारत’ रेल्वेगाडया धावतील. यातील 8 वंदे भारत रेल्वेगाड्या महाराष्ट्रात आहेत. येत्या 10 फेब्रुवारीला आणखी दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत. सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन नव्या ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्यांची संख्या 10 होणार आहे.

Shocking incident happened in Maharashtra : पतीच्या मृत्यूनंतर नणदेने गळ्यात चपलांचा हार घालून वहिनीची गावातून काढली धिंड

Bus Accident : पुणे सोलापूर महामार्गावर लक्झरी बसचा अपघात, 4 ठार

वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये

  1. भारतात आता आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज वंदे भारत एक्सप्रेस 2.0 धावत आहेत
  2. वंदे भारत एक्सप्रेस 2.0 मध्ये धडक टाळण्यासाठीची कवच नावाची स्वदेशी यंत्रणा कार्यरत आहे
  3. वंदे भारत 2.0 ही गाडी 52 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकते. या रेल्वेगाडीचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर पर्यंत पोहोचतो. 
  4. सुधारित वंदे भारत एक्‍सप्रेसचे वजन 392 टन आहे. आधीच्या वंदे भारत गाडीचे वजन  430 टन होते. 
  5. सुधारित वंदे भारत एक्‍सप्रेसमध्ये वाय-फाय कंटेंट ऑन-डिमांड सुविधा उपलब्ध आहे . या रेल्वेगाडीच्या मागील आवृत्‍तीत असलेल्या  24 इंच रुंदीच्या स्‍क्रीन होत्या. आता  प्रत्‍येक डब्यामध्ये 32 इंच रुंदीचे स्‍क्रीन आहेत. या स्क्रीनद्वारे प्रवाशांना  माहिती आणि मनोरंजन उपलब्ध होते. 
  6. सुधारित वंदे भारत एक्‍सप्रेसमध्ये ऊर्जेची बचत करणारी आधुनिक एसी सिस्टिम आहे. तसेच गाडीत हवा शुद्ध आणि आरोग्यदायी राहावी यासाठी आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे.
  7. सुधारित वंदे भारत एक्‍सप्रेसच्या सर्व डब्यांमध्ये आरामदायी आसनांची म्हणजेच साइड रिक्लायनर सीटची सुविधा.
  8. सुधारित वंदे भारत एक्‍सप्रेसच्या एक्झिक्युटिव्ह डब्यामध्ये  180 अंशात  फिरणारी आसने.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी