विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ जण रिंगणात, सदाभाऊ खोत यांच्या रुपाने भाजपचा सहावा उमेदवार

MLC Election 2022 : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. आतापर्यंत पाच उमेदवार जाहीर करणाऱ्या भाजपने खोत यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

12 candidates for 10 seats in Maharashtra Legislative Council, BJP's sixth candidate in the form of Sadabhau Khot
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ जण रिंगणात, सदाभाऊ खोत यांच्या रुपाने भाजपचा सहावा उमेदवार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत.
  • भाजपच्या पाच उमेदवारांनी अर्ज दाखल
  • अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांना भाजपचा पाठिंबा

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेसाठी आता 10 जागांसाठी निवडणूक आहे. यासाठी गुरुवारी भाजप, शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या ११ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केला. दरम्यान, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपच्यावतीने सहावा उमेदवार मैदानात उतरवला आहे. (12 candidates for 10 seats in Maharashtra Legislative Council, BJP's sixth candidate in the form of Sadabhau Khot)

अधिक वाचा : 

AURANGABAD | औरंगाबाद शहरातील पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप कार्यालयावर अचानक केला हल्ला.

विधानपरिषद निवडणुकीसाठी राज्यातील प्रमुख चार पक्षांनी बुधवारी आपले उमेदवार जाहीर केले. यावेळी भाजपने जाहीर केलेल्या पाच उमेदवारांमध्ये भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांचे नाव नसल्याने खोत यांना डावलल्याची चर्चा सुरू होती.

अधिक वाचा : 

Ice cream Theft :  नागपुरात वाढत्या उन्हामुळे चोरट्यांनी बदलला मार्ग, 2 दुकानातून 100 किलोहून अधिक आईस्क्रीम लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद

विधान परिषदेसाठी आज शिवसेनेच्यावतीने सचिन अहिर, आमश्या पाडवी, काॅंग्रेसच्यावतीने भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे, भाजपच्यावतीने प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रसाद लाड, राष्ट्रवादीच्यावतीने एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी अपक्ष अर्ज भरल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. खोत यांना अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर त्यांच्या विजयासाठी भाजपकडून रसद पुरवली जाणार आहे.

सदाभाऊ खोत यांचा अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खासदार रणजित नाईक निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार कुचे, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार, महिला प्रदेशाध्यक्ष निता खोत, युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, राज्य प्रवक्ते सुहास पाटील, भानुदास शिंदे, प्रकाश साबळे तसेच राज्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आज सदाभाऊ खोत यांनी भाजपाच्या पाठिंब्याने विधान परिषदेचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी सोबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील साहेब, खासदार रणजित नाईक निंबाळकर साहेब, आमदार गोपीचंद पडळकर साहेब, आमदार कुचे साहेब, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार, महिला प्रदेशाध्यक्ष निता खोत, युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, राज्य प्रवक्ते सुहास पाटील, भानुदास शिंदे, तसेच राज्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, सदाभाऊ हे शेतकरी नेते आहेत. त्यांचा विधीमंडळातील सहभाग हे शेतकऱ्याचे प्रतिनिधित्वच असेल. त्यांचा भाजपचा पाठिंबा आहे. भाजच्या पाच  अधिकृत उमेदवारांसोबत सदाभाऊंना निवडणून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी