Maharashtra Heatstroke Case : ...म्हणून उष्माघाताने 13 श्रीसेवकांचा जीव घुसमटला, चौकशीतून पुढे आली धक्कादायक कारणे

13 people lost their lives due to heatstroke, shocking reasons emerged from the investigation : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा रविवार 16 एप्रिल 2023 रोजी नवी मुंबईमधील खारघर येथे झाला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांपैकी 13 श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. चौकशीतून धक्कादायक कारणे कळली.

13 people lost their lives due to heatstroke, shocking reasons emerged from the investigation
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी 13 जणांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी 13 जणांचा मृत्यू
  • उष्माघाताने झाले 13 मृत्यू
  • चौकशीतून पुढे आली धक्कादायक कारणे

13 people lost their lives due to heatstroke, shocking reasons emerged from the investigation : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा रविवार 16 एप्रिल 2023 रोजी नवी मुंबईमधील खारघर येथे झाला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांपैकी 13 श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. या प्रकरणी आतापर्यंत झालेल्या चौकशीतून धक्कादायक कारणे कळली आहेत.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांची अर्थात श्रीसेवकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी धर्माधिकारी यांना ऐकण्यासाठी अलोट गर्दी होणार याचा साधारण अंदाज राज्य शासनाला होता. पण या गर्दीसाठी नियोजन करताना अक्षम्य हलगर्जीपणा झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट दिसत आहे.

कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान 4 ते 5 तास रणरणत्या उन्हात विनामंडप किंवा विनाछप्पर बसून राहिल्यामुळे अनेकांना उन्हाचा त्रास झाला. पण पाण्यासाठीचे नियोजन करताना गंभीर चूक झाली. या चुकीमुळे अनेकांना त्रास झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

नियोजनानुसार मैदानाच्या एका बाजूस श्रीसेवकांना पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो नळांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी मैदानात तात्पुरती पाण्याची लाईन टाकण्यात आली होती. पण सगळे नळ मैदानाच्या एकाच बाजूस होते. 

सोहळा संपेपर्यंत बहुसंख्य श्रीसेवक जागा सोडणार नाहीत. कार्यक्रम संपेल त्यावेळी उन्हाचा नैसर्गिक परिणाम म्हणून पाणी पिण्यासाठी मैदानाच्या एकाच बाजूस गर्दी होईल या मुद्याकडे नियोजन करताना दुर्लक्ष झाले. या अक्षम्य चुकीचा गंभीर परिणाम झाला.

कार्यक्रम संपताच तहानलेल्या श्रीसेवकांनी पाणी पिण्यासाठी धाव घेतली. तात्पुरती व्यवस्था म्हणून पिण्याच्या पाण्याचे शेकडो नळ उभारण्यात आले होते. पण सगळे नळ मैदानाच्या एकाच बाजूस होते. यामुळे मैदानाच्या त्या बाजूस अफाट गर्दी झाली. उष्णतेने तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या जलवाहिनीतील पाणी तापले होते. नळांमधून गरम पाणी येऊ लागले. या पाण्यामुळे श्रीसेवकांची तहान भागत नव्हती. तेव्हा या श्रीसेवकांनी काही मीटर अंतरावर असलेल्या पाण्याच्या टँकरमध्ये थंड पाणी असेल, या विचाराने तिकडे धाव घेतली. टँकर जवळ गर्दी वाढली आणि मर्यादीत भागात वेगाने वाढत असलेल्या गर्दीमुळे अनेक श्रीसेवकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या परिस्थितीत अनेक श्रीसेवकांना खूप तहान लागली असूनही लवकर पाणी मिळाले नाही. उन्हामुळे झालेला त्रास आणि न मिळालेले पाणी तसेच गर्दीत असल्यामुळे होऊ लागलेली घुसमट या सगळ्याचा एकत्रित परिणाम झाला आणि अनेक जणांची तब्येत बिघडली. तब्बल 13 श्रीसेवकांचा मृत्यू झाला. 

छान किती दिसती साराच्या या अदा

अभिनेत्रीच्या लग्नाची गोष्ट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी