कोकणात फिरायला जाणाऱ्यांसाठी.... 'या' किल्ल्यावर ३ महिने प्रवेशबंदी

3 months ban on seashore tourism : पावसाळ्यातील धोके लक्षात घेऊन महाराष्ट्र सागरी मंडळाने ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत समुद्र पर्यटन बंद ठेवले असल्याचे जाहीर केले आहे.

3 months ban on seashore tourism
कोकणात फिरायला जाणाऱ्यांसाठी.... 'या' किल्ल्यावर ३ महिने प्रवेशबंदी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कोकणात फिरायला जाणाऱ्यांसाठी.... 'या' किल्ल्यावर ३ महिने प्रवेशबंदी
  • ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत समुद्र पर्यटन बंद
  • महाराष्ट्र सागरी मंडळाचा निर्णय

3 months ban on seashore tourism : पावसाळ्यातील धोके लक्षात घेऊन महाराष्ट्र सागरी मंडळाने ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत समुद्र पर्यटन बंद ठेवले असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे कोकणात फिरायला जाणाऱ्यांना आता ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत समुद्र पर्यटनाचा आनंद घेता येणार नाही. जंजिरा या जलदुर्गावर जाण्यासाठी पर्यटकांना समुद्रमार्गे प्रवास करावा लागतो. पण ही वाहतूक महाराष्ट्र सागरी मंडळाने बंद केली आहे. यामुळे ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत पर्यटकांना जंजिरा या जलदुर्गावर जाता येणार नाही.

रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पर्यटनासाठी सुरक्षित आहेत. पण पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला जाणे धोक्याचे आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने तर अलिबागसह नागाव, काशीद, मुरूड या समुद्र किनाऱ्यांवर नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच राज्यात इतरत्र समुद्र किनारे, धबधबे, धरणे, तलाव आणि मोठा जलसाठा असलेली इतर पर्यटनस्थळे अशा ठिकाणी नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तीन महिने समुद्र पर्यटन बंद असल्यामुळे पर्यटनासाठी लोणावळा, खंडाळा आणि माथेरान या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. कोकणातील समुद्र किनाऱ्यांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. पण पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. या परिस्थितीत पर्यटन धोक्याचे आहे. सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे समुद्राच्या ठिकाणी दुर्घटना घडल्याची उदाहरणे आहेत. यामुळेच खबरदारी म्हणून महाराष्ट्र सागरी मंडळाने ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत समुद्र पर्यटन बंद ठेवल्याची घोषणा केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी