Solapur Accident : कार्तिकी वारी अखेरची ठरली ... ! दिंडीत चालणाऱ्या 7 वारकऱ्यांना कारने चिरडले

Road accident : सोलापुरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव कारने धडक दिल्याने 7 वारकऱ्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली आहे. अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

7 people died after being crushed by a car on Sangola-Miraj road
Solapur Accident : कार्तिकी वारी अखेरची ठरली ... ! दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीतील वारकऱ्यांना कार चिरडले  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • वारकऱ्यांवर काळाचा घाला
  • सांगोला-मिरज मार्गावर भीषण अपघात
  • मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत

सोलापूर :  गुजरातच्या मोरबी येथे केबल पूल नदीत कोसळल्याने मोठी जीवतहानी झाल्याची बातमी ताजी असताना आज सोलापूरमध्ये सांगोला-मिरज मार्गावर भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत भजन, टाळ-वाद्यांच्या निनादात कार्तिक वारीसाठी निघालेल्या 7 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सर्व मृत वारकरी कोल्हापूर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. (7 people died after being crushed by a car on Sangola-Miraj road)

अधिक वाचा : Devendra Fadnavis : बच्चू कडू कसे फुटले?, देवेंद्र फडणवीसांनी सांगितला सगळा घटनाक्रम

कोल्हापूर जिल्ह्यातून पंढरपूरकडे कार्तिक वारीसाठी निघालेल्या दिंडीचा विसावा जुनोनी जवळील श्रीरामवाडी येथे होता. सांगोला-मिरज मार्गावर आणखी दोन किलोमीटर अंतरावर विसावा असताना (एम. एस. 13 डी.ई. 7938) ही कार भरधाव वेगात दिंडीत घुसली. यात शारदा आनंद घोडके, सुशीला पवार, गौरव पवार, रंजना जाधव, सर्जेराव जाधव, सुनीता काटे, शांताबाई जाधव (सर्व रा. जठारवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला. 
 

कोल्हापूर जिल्ह्यातील 36 वारकरी हे कार्तिक वारीसाठी पंढरपूरला निघाले होते. त्यांची दिंडी रस्त्याच्या एका कडेने ज्ञानोबा-माऊलीचा जप करत मार्गक्रमण करीत होती. त्याचवेळी एक भरधाव कार थेट दिंडीत घुसल्याने सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे सांगोला-मिरज मार्गावरील वाहतूक खोळंबली. अपघातानंतर कारचा चालक पळून गेला.

अधिक वाचा : Sharad Pawar : शरद पवारांची तब्येत बिघडली, जाणून घ्या नेमकं काय झालं?

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. ते तातडीने घटनास्थळी गेले. दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी