Abortion case in jalna | जालना : जालना शहरात गर्भलिंगदान करून गर्भपात केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान गर्भपात करणाऱ्या डॉक्टराचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले आहे. मात्र सदर घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी डॉक्टर फरार झाला आहे. सतीश गवारे असे फरार झालेल्या आरोपी डॉक्टराचे नाव आहे. जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात राजुश्वेर क्लिनिकमध्ये गर्भलिंगनिदान करून गर्भपात करण्यात येत असल्याची तक्रार पुण्यातून जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांना प्राप्त झाली होती. (A case has been registered against a doctor who performed an abortion by diagnosing a fetus).
अधिक वाचा : आज राजस्थानला चितपट करून मुंबई उघडणार विजयाचं खातं?
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार मिळाल्यानंतर त्याच्यावर ठोस पावले उचलत त्यानुसार सापळा रचून जिल्हा शल्य चिकित्सक आणि पोलिसांनी एका गर्भवती महिलेला दवाखान्यात पाठवून ही कारवाई केली. लक्षणीय बाब म्हणजे गर्भलिंगनिदान आणि गर्भपातासाठी तब्बल ४० हजार रूपये घेत असल्याची माहिती या कारवाईतून समोर आली आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर आरोपी डॉक्टर सतीश गवारे गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी असलेली मशीन घेऊन फरार झाला आहे. दरम्यान दवाखान्याच्या आणखी काही भागात झडती केली असता पोलिसांनी आणखी काही वस्तू सापडल्या आहेत.
दवाखान्यात छापा टाकल्यानंतर गर्भपाताच्या किट, औषधे, वेगवेगळ्या मशीन असे साहित्य पोलिस आणि आरोग्य विभागाच्या पथकाला घटनास्थळी आढळून आले असून ते साहित्य जप्त करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलिस ठाण्यात गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह इतर ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.