Mumbai Mega Block : आज अनेक मार्गांवर मेगाब्लॉक, बोरिवली आणि गोरेगावदरम्यान पाच तासाचा जंबो ब्लॉक

गावगाडा
भरत जाधव
Updated Jul 31, 2022 | 07:57 IST

लोकल रेल्वेला (Local Railway) मुंबईची (Mumbai ) लाईफ लाईन म्हणतात. परंतु आज ही जीवनवाहिनी तांत्रिक कामांसाठी बंद असणार आहे. आज रविवारी (31 जुलै) रेल्वेने अनेक मार्गांवर मेगाब्लॉक (Mega Block ) ठेवला आहे. हा मेगाब्लॉक हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेमध्ये (Western Railway) ठेवण्यात आला आहे. तर सीएसएमटी (CSMT) ते कल्याण या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक असणार नाही.

Big news related to Mumbai Local, megablock on many routes today
मुंबई लोकल संबंधित मोठी बातमी, आज अनेक मार्गांवर मेगाब्लॉक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • विविध तांत्रिक कामांच्या दृष्टीने हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम मार्गावरील बोरिवली-गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक
  • पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव दरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक
  • सीएसएमटी, वडाळा-वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यान अप-डाऊन लोकल धावणार नाहीत.

Mumbai Mega Block Updates : लोकल रेल्वेला (Local Railway) मुंबईची (Mumbai ) लाईफ लाईन म्हणतात. परंतु आज ही जीवनवाहिनी तांत्रिक कामांसाठी बंद असणार आहे. आज रविवारी (31 जुलै) रेल्वेने अनेक मार्गांवर मेगाब्लॉक (Mega Block ) ठेवला आहे. हा मेगाब्लॉक हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेमध्ये (Western Railway) ठेवण्यात आला आहे. तर सीएसएमटी (CSMT) ते कल्याण या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक असणार नाही. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, रविवार, 31 जुलै रोजी विविध तांत्रिक कामांच्या दृष्टीने हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम मार्गावरील बोरिवली-गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. मात्र, सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गांवर मेगाब्लॉक नसल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.

काही लोकल गाड्या आज रद्द

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव दरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. ब्लॉक दरम्यान या दोन स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील. तर काही लोकल गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. 

Read Also : झिंबाब्वे विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा

सीएसएमटी/वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार. पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीसाठी सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 या वेळेत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे दरम्यानच्या दोन्ही मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी, वडाळा-वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यान अप-डाऊन लोकल धावणार नाहीत. मात्र, पनवेल-कुर्ला दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत ठाणे-वाशी, नेरुळ अप-डाऊन येथेही मेगाब्लॉक राहणार आहे. मात्र, सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक टाकण्यात आलेला नाही.

पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान 20 मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेनलाइन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. तर सीएसएमटी-कल्याण मुख्य मार्गावर मेगाब्लॉक असणार नाही.

Read Also : उच्च कोलेस्टेरॉलचा डोळ्यांवर काय परिणाम होतो? तीन लक्षणे

पाच तासांचा जंबो ब्लॉक

ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 10.35 ते 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील सर्व स्लो गाड्या बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉक काळात काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी