... जेव्हा एक जण ट्राफिकमध्ये घालतो PSI च्या काॅलरवर हात

satara crime : सातारा जिल्ह्यातील एकाने ट्राफिकमध्ये पोलिस उपनिरीक्षकाची काॅलर धरुन त्याला दमदाटी केल्याची धक्कादायक घडली..

A police officer was beaten up in Koregaon
... जेव्हा एक जण ट्राफिकमध्ये PSI चीच काॅलर धरतो 
थोडं पण कामाचं
  • पोलीस उपनिरीक्षकाची काॅलर धरुन दमदाटी मारहाण
  • जुन्या मोटार स्टँडसमोर वाहतूक कोंडी
  • याप्रकरणी कोरेगाव पोलिसांत गुन्हा दाखल

Satara : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहरामधील जुना मोटार स्टँड परिसरात ट्राफिकमध्ये एकाने ड्युटीवर असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाची काॅलर धरुन दमदाटी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर कोरेगाव पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (A police officer was beaten up in Koregaon)

अधिक वाचा : भितीदायक! भटक्या कुत्र्यांचा बुलढाण्यात हैदोस; १० वर्षांच्या चिमुकलीच्या हातापायाचे तोडले लचके

कोरेगाव पोलिस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षक विशाल अंकुश कदम (वय ३२) हे शुक्रवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास कोरेगाव शहर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, जुन्या मोटार स्टँडसमोर वाहतूक कोंडी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी रस्त्यावर उतरून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा रस्त्याकडे एक काळ्या रंगाची कार (एमएच ११ : एएफ १) उभी होती. म्हणून पीएसआय कदम यांनी या गाडीच्या चालकास गाडी पुढे जाण्यास सांगितले. यावरुन चालक अक्षय लालासाहेब पवार (रा. खंडोबाचा माळ, सातारा) आणि त्यांच्यासोबत असलेल्या मित्र संकेत राजू जाधव (रा. कोरेगाव) याने अरेरावी करण्यात सुरुवात केली. त्यावरुन कदम यांचा गाडीतील दोघांशी वाद सुरू झाला. 

अधिक वाचा : Aaditya Thackeray : आम्ही काय कमी दिलं की त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला? आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला सवाल

पीएसआय कदम यांनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालू नका. तुमची गाडी बाजूला घ्या, असे सांगितले. त्यावर पवार याने कदम यांच्याकडे पाहून "कदम साहेब ही गाडी माझीच आहे. डॉन परत कोरेगावला आला आहे. लोकांना कळू द्या.. असे ओरडून सांगितले. दोघांत वादावादी सुरू झाली. गाड्या बाजूला काढा अन्यथा मला तुमच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे पीएसआय कदम यांनी सांगितले.

त्यावर पवार याने श्री. कदम यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करत मारहाण केली. हा प्रकार सुरू असतानाच कोरेगाव पोलिस ठाण्यातील अंमलदार श्री. साळुंखे, पोलिस नाईक श्री. पवार, श्री. घाडगे, पोलिस कॉन्स्टेबल श्री. जाधव तेथे आले. यांनी बळाचा वापर करत पवारला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी जाधव हा त्यांच्या गाडीतून पळून गेला. दरम्यान, याप्रकरणी कोरेगाव पोलिसांत अक्षय पवार व संकेत जाधव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी