पुणे : पुणे शहरालगत असलेल्या फुरसुंगीमधील एका सोसायटीमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीच्या व्हाॅटसअप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून एका व्यक्तीने साथीदारासह सोसाटीच्या अध्यक्ष असलेल्या महिलेच्या पतीला जबरी मारहाण केली. या घटनेमुळे पुणे परिसरात खळबळ उडाली आहे. (a terrible act done in a fit of anger, a tongue had to be cut out)
पिडीताच्या पतीने दिलेल्या तक्रारीनंतर हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश किसन पाेकळे, सुयाेग भरत शिंदे, अनिल म्हसके, शिवराम पाटील, किसन पवार अशी आरोपींची नावे आहेत.
अधिक वाचा : Death While Making Reels : रील्स बनवताना रेल्वेची धडक, दोघांचा मृत्यू
घटनेबाबत माहिती अशी की, पुण्यातील फुरसुंगी येथे ओम हाईटस सहकारी गृहनिर्माण संस्था नावाची साेसायटी आहे. या सोसायटीच्या अध्यक्षा प्रिती किरण हरपळे (वय-38) असून सोसायटीच्या सदस्यांचा 'ओम हाईटस ऑपरेशन' नावाचा व्हाट्स अप ग्रुप आहे. या ग्रुपमधून हरपळे यांनी सुरेश पोकळे यांना रिमुव्ह केले. या राग मनात धरून पोकळे यांनी प्रिती हरपळे यांचे पती किरण हरपळे यांना फोनवर जाब विचारला.
त्यानंतर सोसायटीच्या कार्यालयात हरपळे आणि पोकळे या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाली. यावेळी पोकळे यांनी त्यांच्या चार साथीदारांसह किरण हरपळे यांना बेदम मारहाण केली. यात त्यांच्या जीभला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची जीभ कापावी लागली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एन. शेळके करत आहेत.