...तर भारताचा इटली होईल, थेट इटलीवरुन मराठी तरुणाने सांगितली भयंकर परिस्थिती 

गावगाडा
Updated Mar 22, 2020 | 14:55 IST

इटलीमध्ये राहणाऱ्या एका महाराष्ट्रीयन तरुणाने येथील सर्वांना अत्यंत कळकळीचे आवाहन केले आहे. कोरोना रोखला नाही तर काय होईल याबाबतही त्याने सांगितलं आहे. 

a terrible situation in italy due to coronavirus told by marathi youth directly from italy
...तर भारताचा इटली होईल, थेट इटलीवरुन मराठी तरुणाने सांगितली भयंकर परिस्थिती   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे अत्यंत भयंकर स्थिती
  • मराठी तरुणाने थेट इटलीवरुन साधला भारतीयांशी संवाद
  • इटलीमध्ये मृतांच्या संख्येत वाढ, भारताने काळजी घेण्याचं आवाहन

रोम (इटली): देशात आतापर्यंत कोरोनाचे ३३७ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात देखील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत ७४ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं समजतं आहे. त्यामुळे आता परिस्थिती आणखी भयंकर होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे इटली सारख्या अत्यंत प्रगत राष्ट्राने कोरोनाबाबत जी चूक केली ती भारताने करु नये यासाठी महाराष्ट्रातील उस्मानाबादमधील एका तरुणाने थेट इटलीतून भारतातील जनतेला अत्यंत कळकळीची विनंती केली आहे. 

चीनपासून कोरोना व्हायरसच्या संसर्गला सुरुवात झाली हळूहळू त्याचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला. मात्र, याचा सर्वाधिक फटका आता युरोपातील देशांना बसत आहे. कारण की, येथे कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. तर यामुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या देखील प्रचंड झपाट्याने वाढत आहे. यामुळे आता कोरोनाची दहशत संपूर्ण जगात पसरली आहे. इटली आणि चीनच्या तुलनेत भारतात सध्या तरी रुग्ण हे फार कमी आहेत. मात्र, ही परिस्थिती हाताबाहेर जाण्यास फार वेळ लागू शकत नाही. त्यामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याशिवाय भारताकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं इटलीतील विशाल उंदरे या तरुणाने सांगितलं आहे. 

पाहा थेट इटलीतून विशालने काय केलंय आवाहन? 


विशालच्या मते, भारतात प्रचंड लोकसंख्या आहे त्यामुळे जर कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला तर अत्यंत भयंकर स्थिती उद्भवू शकते. अशावेळी प्रशासनाने वेळ पडल्यास क्रिकेटची मैदानं तात्पुरते रुग्णालय म्हणून सज्ज ठेवावेत. यासारखे अनेक गोष्टी विशालने आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून सांगितल्या आहे.

देशात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारत कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या फेजच्या उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे. जर भारतात तिसरी फेज सुरु झाली तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतात. अशावेळी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून घरी राहणं हेच योग्य ठरणार आहे. त्यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...