मुंबईच्या समुद्रात खोदणार बोगदा… जाणून घ्या कधी धावणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन

mumbai-ahmedabad bullet train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम आता जमिनीवर दिसणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर अंतर्गत 21 किमी. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने लांब बोगदा बनवण्यासाठी निविदा निघाली आहे.

मुंबईच्या समुद्रात खोदणार बोगदा… जाणून घ्या कधी धावणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन
A tunnel will be dug in the sea of Mumbai... Know when the Mumbai-Ahmedabad bullet train will run  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबई ते ठाणे मार्गावर देशातील पहिला समुद्राखालील बोगदा उभारणार
  • समुद्राखालील बोगद्याच्या कामांना लवकरच ठाण्यात सुरुवात होणार
  • 7 किमी लांबीचा असेल प्रवास

Bullet Train in India: आता मुंबई ते अहमदाबाद दरम्यान हायस्पीड ट्रेन म्हणजेच बुलेट ट्रेन लवकरच धावणार आहे. बुलेट ट्रेन महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधील बहुतांश मार्गांवर ऐलिवेटेड ट्रॅकवर धावणार आहे, परंतु मुंबईतील बीकेसी ते शिळफाटा दरम्यान तिला बोगद्यातून जावे लागेल. हा बोगदा सिंगल ट्यूबचा असेल आणि त्याला दुहेरी ट्रॅक असतील. NHSRCL नुसार एकूण 20.37 कि.मी. बोगदा बांधावा लागेल. (A tunnel will be dug in the sea of Mumbai... Know when the Mumbai-Ahmedabad bullet train will run)

अधिक वाचा :  IMD Alert: मुसळधार पाऊस आणि गारपीट... , येत्या दोन दिवसात कुठे कुठे पडणार पाऊस

पावसाळ्यापूर्वीच या कामाचा शुभारंभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२८ ही मुंबई-अहमदाबाद मार्गावरील या बोगद्याची डेडलाईन आहे.बुलेट ट्रेनसाठी समुद्राखाली सुमारे 7 कि.मी. लांब बोगदा असणार आहे. यापैकी 15.42 कि.मी. 4.96 किमी अंतरापर्यंत तीन टनेल बोरिंग मशिनच्या साह्याने खोदकाम केले जाणार आहे. न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करून बोगदा बांधला जाईल. या कामासाठी तीन ठिकाणी शाफ्ट तयार करण्यात येणार आहेत. बुलेट ट्रेनचा बोगदा जमिनीपासून २४ मीटर खाली तयार होईल. हा बोगदा ठाणे खाडीखालून जाणार आहे. त्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेनवरील बीकेसी आणि शिळफाटा स्थानकांदरम्यान ठाणे खाडीवर हा बोगदा असेल. बीकेसी ते शिळफाटा हे अंतर जवळपास ३५ किलोमीटर इतके आहे. 

अधिक वाचा :  बीडच्या बाजार समितीच्या निवडणुकीवरून क्षीरसागर काका-पुतणे आमने-सामने

नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प हा ५०८.१७ किमी लांबीचा कॉरिडॉर आहे.महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी आतापर्यंत 13.72 टक्के काम झाले आहे. तर गुजरातमध्ये ३२.९३ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबईत समुद्राखाली 13.1 मीटर व्यासाचा बोगदा असेल, ज्यामध्ये दोन ट्रॅक असतील. जमिनीखाली 25 ते 40 मीटर खोल बोगदा करण्यात येणार आहे. मुंबई HSR कडून मेट्रो लाईन 2B ला कनेक्टिव्हिटी दिली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी