पोलीस भरतीत मैदानात उशीरा आल्याने तरुणीचा विनयभंग, अन् अमानुष मारहाण

गावगाडा
भरत जाधव
Updated Jul 26, 2022 | 12:06 IST

Aurangaba​d Molestation : महिलांवर (woman) दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहेत. नोकरीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी महिलांना वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सामोरे जावे लागतं. महिलांना न्याय देण्यासाठी त्यांना संरक्षण देण्यासाठी पोलीस कार्यक्षम आहेत, असं म्हटलं जातं, परंतु खुद्द पोलीस कर्माचारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलीदेखील  (Police Department) सुरक्षित नसल्याचं औरंगाबादेत (Aurangabad) घडलेल्या घटनेवरुन दिसून येत आहे. 

 A young woman was molested for coming late to the police recruitment field
पोलीस भरतीत मैदानात उशीरा आल्याने तरुणीचा विनयभंग  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मैदानात उशिरा पोहोचल्यामुळे संचालकाने रात्री तरुणीच्या खोलीत जाऊन तिचा विनयभंग केला.
  • नवनाथ राठोड असं आरोपी संस्थाचालकांचं नाव आहे.
  • औरंगाबाद शहरातील हडको परिसरात स्पेशल फोर्स अकॅडमीत ही घटना घडली

औरंगाबाद : Aurangaba​d Molestation : महिलांवर (woman) दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहेत. नोकरीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी महिलांना वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सामोरे जावे लागतं. महिलांना न्याय देण्यासाठी त्यांना संरक्षण देण्यासाठी पोलीस कार्यक्षम आहेत, असं म्हटलं जातं, परंतु खुद्द पोलीस कर्माचारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलीदेखील  (Police Department) सुरक्षित नसल्याचं औरंगाबादेत (Aurangabad) घडलेल्या घटनेवरुन दिसून येत आहे. 

मैदानात उशिरा पोहोचल्यामुळे संचालकाने रात्री तरुणीच्या खोलीत जाऊन तिचा विनयभंग केल्याची घटना घडल्याचं समोर आले आहे. पोलीस भरतीचे प्रशिक्षण (Training of Police Recruits) घेणाऱ्या १७ वर्षीय युवतीला अगोदर मारहाण केली व नंतर रात्री तिच्या खोलीत जाऊन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील हडको भागात असलेल्या स्पेशल फोर्स अकॅडमीत घडला आहे. 

Read Also : जालियनवाला बागेतील विहीरीत नाही दिसणार पैसा, जाणून घ्या का?

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ राठोड (रा.हडको, औरंगाबाद) असं आरोपी संस्थाचालकांचं नाव आहे. औरंगाबाद शहरातील हडको परिसरात स्पेशल फोर्स अकॅडमी आहे. या अकॅडमीत सिल्लोड तालुक्यातील १७ वर्षीय युवतीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणास प्रवेश घेतला होता. यानंतर ६ व ७ जुलै रोजी तीला मैदानात येण्यास उशीर झाला होता. त्यामुळे 'तू आज मैदानावर का आली नाही' असे म्हणत संस्थाचालकाने तिचा हात धरून चार ते पाच वेळा कानशिलात लगावली.

Read Also : बेयर ग्रिल्स मांसाहारी जेवणावर मारतो ताव, असा आहे डाएट

संस्थाचालक एवढ्यावरच थांबला नाही. यानंतर रात्री जबरदस्तीने पीडित युवतीच्या खोलीत घुसून तिचा विनयभंग केला. जेव्हा युवतीने विरोध केला तेव्हा खोलीतील झाडूने मारहाण केली. भेदरलेल्या तरुणीने ही घटना नातेवाईकांना सांगितल्यानंतर पोलीस ठाणे गाठून घडलेली हकीकत सांगितली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सिडको पोलीस ठाण्यात संचालकाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी फरार झाला  आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी