आदित्य ठाकरे निवडणूक लढणार? पाहा काय म्हणतायत संजय राऊत

गावगाडा
Updated Jun 13, 2019 | 11:58 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Aaditya Thakceray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून एक मोठं वक्तव्य समोर आलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या बाबत हे वक्तव्य केलं आहे.

Aaditya Thackeray
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार. कार्यकर्त्यांकडूनही तशी मागणी होत असल्याचं पहायला मिळत आहे. यासोबतच मंत्रिमंडळ विस्तारात आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री बनवण्यात येणार अशीही चर्चा होती. मात्र, आता या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. संजय राऊत यांनी सांगितले की, आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनावेत ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी सुद्धा आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहित आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवण्याची मागणी केली होती. 'हीच वेळ आहे, हीच संधी आहे, लक्ष्य विधानसभा २०१९, महाराष्ट्र वाट पाहतोय' अशी पोस्ट वरुण सरदेसाई यांनी केली होती. 

काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या भाजपच्या बैठकीत पुढील मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल असे वक्तव्य भाजपकडून करण्यात आलं होतं. शिवसेना-भाजप युतीने समान जागा लढवल्याचं ठरवलं असताना मुख्यमंत्री पदावर भाजप दावा करत आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चा सुरू झाल्या. यानंतर युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी पुन्हा ट्विट करुन शिवसेना-भाजप जागावाटपांवर भाष्य केलं होतं. शिवसेना-भाजपमध्ये जागा वाटपांवर निर्णय झाला आहे. दोन्ही पक्ष या निर्णयावर सहमत आहेत. उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ठरवलं आहे की, दोन्ही पक्षांना २.५ - २.५ वर्ष  महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळणार आहे.

जर आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. कारण, बाळासाहेब ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढली नाहीये. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
आदित्य ठाकरे निवडणूक लढणार? पाहा काय म्हणतायत संजय राऊत Description: Aaditya Thakceray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून एक मोठं वक्तव्य समोर आलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या बाबत हे वक्तव्य केलं आहे.
Loading...
Loading...
Loading...