Aaditya Thackeray Speech In Rain: आदित्य ठाकरेंची पवार स्टाईल, मैदानात धो-धो पावसात भिजत शिवसैनिकांशी संवाद

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 21, 2022 | 12:19 IST

Aaditya Thackeray Speech In Heavy Rain: निष्ठा यात्रेदरम्यान बुधवारी वडाळ्यात (Wadala) त्यांनी भरपावसात (heavy rain) भिजत भाषण केलं आहे. आदित्य ठाकरेंची मुंबईत सध्या निष्ठा यात्रा (Nishta Yatra) सुरू आहे.

Aaditya Thackeray Speech In Rain
आदित्य ठाकरेंची भरपावसात सभा  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या धो- धो पावसात कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.
  • निष्ठा यात्रेदरम्यान बुधवारी वडाळ्यात (Wadala) त्यांनी भरपावसात (heavy rain) भिजत भाषण केलं आहे.
  • आदित्य ठाकरेंची मुंबईत सध्या निष्ठा यात्रा (Nishta Yatra) सुरू आहे.

मुंबई: Aditya Thackeray Speech: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar)  यांनी भरपावसात केलेलं भाषण प्रत्येकाला माहित आहे. आता याचीच आठवण आमदार आदित्य ठाकरेंनी (MLA Aditya Thackeray) बुधवारी करून दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतल्या धो- धो पावसात कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. निष्ठा यात्रेदरम्यान बुधवारी वडाळ्यात (Wadala) त्यांनी भरपावसात (heavy rain) भिजत भाषण केलं आहे. आदित्य ठाकरेंची मुंबईत सध्या निष्ठा यात्रा (Nishta Yatra) सुरू आहे.  

गेल्या काही दिवसात शिवसेनेत बरीच उलथापालथ झाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत आमदारांनी बंडखोरी करत राज्यात सत्ता स्थापन केली. आता शिवसेनेतले माजी नगरसेवक आणि कार्यकर्तेही शिंदे गटात सामील होत आहेत. त्यामुळे शिवसेनेला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. 

अधिक वाचा- Heatwave in Europe: युरोपात आलं मोठं संकट, उष्णतेची तीव्र लाट; तब्बल 1700 लोकांचा मृत्यू, रस्तेही वितळले

काल वडाळ्यात आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरू होती. तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला. यावेळी भरपावसात आदित्य ठाकरेंनी भिजतच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छत्री घेण्यासही नकार दिला. त्यांचं भाषण ऐकण्यासाठीही गर्दी जमली होती. 

शरद पवारांच्या भाषणाची करून दिली आठवण 

आदित्य ठाकरेंच्या भाषणामुळे शरद पवारांच्या पावसातल्या भाषणाची पुन्हा एकदा नव्यानं आठवण झाली. शरद पवारांचं साताऱ्यातलं पावसातलं भाषण चांगलंच गाजलं होतं. साताऱ्याच्या पोटनिवडणुकीवेळी शरद पवार यांनी भर पावसात भिजून सभा घेतली होती. 


आदित्य ठाकरे आक्रमक 

आदित्य ठाकरेंनी भायखळ्यातील आग्रीपाडा येथे शिवसेना शाखा क्रमांक 212 ला भेट दिली. यावेळी आमदारांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले दिसले. शिवसैनिकांशी संवाद साधताना बंडखोर आमदारांवर त्यांनी टीकाही केली. यावेळी ते म्हणाले की, गद्दार हे गद्दारच असतात. त्यांचं नाव कितीही बदलली, त्यांनी कितीही गट बदलले तरी गद्दारीचा शिक्का त्यांच्या माथ्यावरून पुसला जाणार नाही. 

आदित्य ठाकरेंचा दौरा 

शिवसेनेची शिवसंवाद यात्रा आजपासून सुरू होत आहे. महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. तीन दिवसांची ही यात्रा असणार आहे. यासाठी आदित्य ठाकरे २१ ते २३ जुलै या काळात ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या यात्रेत भिवंडी, नाशिक, मनमाड, नेवासा येथे ते मेळावे घेणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी