Aditya Thackeray Shivsena: भिवंडीत लगेचच बदलली निष्ठा, आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला शिवसैनिकांची मोठी गर्दी, पण पाठ फिरताच...

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 22, 2022 | 08:30 IST

Shivsena MLA Aditya Thackeray: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेला सावरण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत.

Aditya Thackeray Shiv Sannwad Yatra
आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • राज्यातल्या राजकारणात रोज नवनव्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात.
  • शिवसेनेचे तब्बल 40 आमदार आणि 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले.
  • शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे. त्यामुळे शिवसेनेला सावरण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत.

भिवंडी: Aaditya Thackeray News: राज्यातल्या राजकारणात रोज नवनव्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. एकनाथ शिंदे यांनी आमदारांसोबत बंडखोरी करत भाजपची हातमिळवणी केली आणि राज्यात नवीन सत्ता स्थापन केली. आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे शिवसेना पक्षाला (Shiv Sena party) मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे तब्बल 40 आमदार आणि 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे. त्यामुळे शिवसेनेला सावरण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरेंनी (MLA Aditya Thackeray)  जोमानं काम सुरू केलं असून सध्या त्यांची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. पण काल आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रा करत जोरदार भाषण केलं होतं. मात्र या भाषणाचा काही उपयोग झाला नसल्याचं दिसून आलं. आदित्य ठाकरेंची पाठ फिरताच वेगळं चित्र पाहायला मिळालं. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे. आता शिवसेनेतले माजी नगरसेवक आणि कार्यकर्तेही शिंदे गटात सामील होत आहेत. आदित्य ठाकरे यांनी काल सकाळी भिवंडीत निष्ठा यात्रा घेतली. या यात्रेत त्यांनी सभेत जोरदार भाषण केलं होतं. मात्र निष्ठा यात्रेला काही तास उलटत नाही तोवर भिवंडी महापालिकेतील 33 नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी भिवंडी महापालिकेतील शिवसेनेचे 7 नगरसेवक तर काँग्रेसचे 26 नगरसेवक शिंदे गटात सामिल झाले. 

अधिक वाचा-  Ramdas Kadam: रामदास कदम का रडले एवढे ढसाढसा?

तर आता मिळालेल्या माहितीनुसार,  ठाणे, नवी मुंबई, बदलापूर यानंतर आता भिंवडी महानगरपालिकेतील शिवसेनेचे जवळपास 25 ते 30 नगरसेवक हे शिंदे गटात जाणार आहेत.

नगरमध्ये ही सारखंच चित्र 

तसाच प्रकार नगरमध्ये (Ahmednagar) घडला आहे. पक्षाचे नगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्धार करण्यात आला. मात्र, त्यांची पाठ फिरताच काही पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी रात्रीच मुंबई गाठत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. नगरमध्येही शिवसेना फुटल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनीही शिंदे यांची भेट घेतल्याने तीही चर्चा सुरू झाली आहे.

आदित्य ठाकरेंचा दौरा 

महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेनेची शिवसंवाद यात्रा कालपासून सुरू झाली आहे. तीन दिवसांची ही यात्रा असणार आहे. यासाठी आदित्य ठाकरे 21 ते 23 जुलै या काळात ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद या तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या यात्रेत भिवंडी, नाशिक, मनमाड, नेवासा येथे ते मेळावे घेणार आहेत. काल भिवंडीतून त्यांची ही शिवसंवाद यात्रा सुरु झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी