Aurangabad । सांगा कसं करायचं अन् कसं जगायचं? आदित्य ठाकरेंसमोर शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला

Aaditya Thackeray : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत .

Aditya Thackeray went to the farm and inspected the damage
आदित्य ठाकरेंसमोर शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला, बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पैठणमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला आदित्य ठाकरे
  • शेतकऱ्यांशी संवाद साधला
  • पंचनामे करून तातडीने मदतीची मागणी केली

औरंगाबाद : विदर्भ आमि मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमोर एका नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आश्रूंचा बांध फुटला. आदित्य ठाकरे यांनी त्या शेतकऱ्याला धीर देत शासनाकडे पाठपुरावा करण्याचा विश्वास दिला. (Aditya Thackeray went to the farm and inspected the damage)

अधिक वाचा : साडी गजरा टिकली अशा मराठमोळ्या पेहरावात सुधा मूर्तींनी घेतली संभाजी भिडेंची भेट 

आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहे. काल सल्लोडमध्ये पदाधिकाऱ्यांची सभा घेतली. त्यानंतर आज  आज आदित्य ठाकरे पैठण तालुक्यातील डोणगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी नुकसानीची माहिती घेत असल्याने आदित्य ठाकरेंसमोर एका शेतकऱ्याला आश्रु अनावर झाले. या पावसाने सर्व होत्याचं नव्हतं करून ठेवलंय, आता सांगा कसं करायचं अन् कसं जगायचं, कुणाला सांगायचं, आमचं हे दुःख? कोण समजून घेणार, अशी व्यथा पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांने दिली.  त्यावेळी ठाकरे यांनी त्याला धीर दिली.

अधिक वाचा : Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा रात्री राज्यात, असा असेल राहुल गांधी यांचा आजच्या यात्रेचा कार्यक्रम

राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना उघड्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध करत आदित्य ठाकरे यांनी ४० आमदारांना आव्हान दिले.. सरकार म्हणून ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाकी करा . तसंच तुम्हाला जनतेने गद्दार म्हणून नाही , राज्यकर्ते म्हणून स्वीकारलं असेल, तर तुम्हाला चेलेंज देतो,, मी राजीनामा देतो,, तुम्ही ४० जण राजीनामा देऊन निवडणुका घ्या, बघुयात जनतेचा कौल काय आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेऊन शेतीच्या बांधावर शेतकरी वाट पाहत आहेत. या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये तरी राजकारण करू नये, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

अधिक वाचा : Mumbai-Goa महामार्गावर कशेडी घाटात भीषण अपघात; रिक्षा चालकासह तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

औरंगाबादच्या पंढरपूर परिसरात आज शिवसेनेच्याकडून सरकारच्या विरोधात आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या मेळाव्यात आदित्य ठाकरे स्वतः सहभागी होणार आहे.शिंदे-फडणवीस सरकारच्या योजना,शेतकरीप्रश्न, ओला दुष्काळ आणि विकास कामांवरून आदित्य ठाकरे निशाणा साधण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी