रायगड : महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात दौरा करून शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. आज त्यांच्या शिव संवाद यात्रेचा तिसरा टप्प्या रायगड येथे सुरू आहे. आज त्यांनी अलिबाग येथे रॅली काढण्यात आली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. (Aditya Thackeray: What did Raigad get in the betrayal?, Aditya Thackeray's target)
अधिक वाचा : Mumbai-Pune Accident : गोव्याहून फिरून आले काही वेळात घरी पोहचणार, इतक्यात होत्याचे नव्हते झाले
आदित्य ठाकरे यांनी भाजप कार्यालयाच्या समोर शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी सुरूवातीलाच भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून तुम्ही घाबरू नका, ही लढाई तुमच्याविरोधात नाही असं स्पष्ट करत बंडखोर आमदारांवर बरसले. अलिबाग व महाड या दोन तालुक्यात जाहीर सभेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर कडाडून हल्ला चढवला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, संपर्क प्रमुख किशोर जैन, महिला संघटक दिपश्री पोटफोडे , शंकर गुरव आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, या गद्दारांना सर्व दिलं चांगली खाती दिली तरीही गद्दारी केली. ही गद्दारी तरुणांना संदेश आहे की चांगल्या लोकांना या राजकारणात संधी नाही हे दाखवण्यासाठी आहे. शिवसेनेला फोडा मराठी हिंदूंमध्ये फूट पाडा, ठाकरेंना एकटे पाडा, हीच यांची इच्छा आहे. ज्यात उपमुख्यमंत्री हे खरे मुख्यमंत्री आहेत. मंत्रीमंडळ जाहीर व्हायला ४१ दिवस लागले. या मंत्रीमंडळात रायगडचं कोणी नाही, मुंबईचं कोणी नाही, महिलांना स्थान नाही. आता जी गद्दारी झाली त्यात रायगडला काय मिळालं? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाचा पहिला निर्णय या रायगडसाठी ६०० कोटी दिले. आम्ही गद्दारांचे विधानभवनात चेहरे बघत होतो. चेहरे लपवून चालत होते. गेम झाल्याचे चेहऱ्यावर दिसत होतं, पण अजून वेळ गेली नाही. ज्यांना ज्यांना वाटत आहे परत यायचे आहे त्यांच्यासाठी दरवाजे सदैव खुले आहेत, असा पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी केला.