चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने अखेर २२ वर्षांनंतर मिळाले कुटुंबियांना

stolen gold recovery in mumbai : कोर्टाने मुंबईतील एका कुटुंबाला २२ वर्षांपूर्वी चोरी केलेले सर्व दागिने परत करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये एक सोन्याचे नाणे, दोन सोन्याच्या बांगड्या आणि 1,300 ग्रॅम आणि 200 मिलिग्रॅमच्या दोन इंगॉट्सचा समावेश होता.

After 22 years, the family finally got the stolen gold and silver jewelry
चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने अखेर २२ वर्षांनंतर मिळाले कुटुंबियांना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईत 1998 मध्ये करोडोंचे दागिने चोरीला गेले होते
  • पोलिसांनी लुटीचा काही भाग जप्त केला होता
  • पीडित कुटुंबाने सर्व बिले आणि पावत्या जमा केल्यानंतर न्यायालयाने कुटुंबीयांना परत करण्याचे आदेश दिले

मुंबई : कुलाब्यातील एका घरात १९९८ मध्ये दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून सोने-चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील चोरीच्या दागिन्यांचा मुद्देमाल जप्त केला. हे दागिने ५ जानेवारी रोजी न्यायालयाने त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. पिडीत कुटुंबियांनी सर्व बिले आणि पावत्या सादर केल्यानंतर हे दागिने त्यांना सुपूर्द करण्यात आले. (After 22 years, the family finally got the stolen gold and silver jewelry)

8 मे 1998 रोजी कुलाबा येथील अर्जन दासवानी यांच्या घरात चाकू घेऊन एक टोळी घुसली होती. या टोळक्याने सुरक्षा रक्षकाला मारहाण करून तिजोरीच्या चाव्या बळजबरीने हिसकावून घेतल्या. सोबतच दासवानी आणि त्यांच्या पत्नीला बांधून लूटमार करून पळ काढला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी 1998 मध्ये लुटीचा काही भाग जप्त केला होता. 1999 मध्ये हा खटला न्यायालयाकडे सोपवण्यात आल्यानंतर खटला चालला. दरम्यान अर्जन दासवानी यांचे 2007 मध्ये निधन झाले.

न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, "वस्तू, विशेषत: सोन्याच्या वस्तू पोलिसांच्या ताब्यात ठेवून कोणताही हेतू साध्य होणार नाही." २२ वर्षांहून अधिक काळ लोटला. दोन फरार आरोपींच्या अटकेत कोणतीही प्रगती न झाल्याने न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. तक्रारदाराने आपल्या मालमत्तेच्या परतीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहण्यास सांगितले तर ती न्यायाची थट्टा आणि कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग ठरेल. याचे उदाहरणही दिले.

२२ वर्षांपूर्वी चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने अखेर कुटुंबाला परत करण्यात आले. ५ जानेवारी रोजी न्यायालयाने त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. या दागिन्यांमध्ये राणी व्हिक्टोरियाचे चित्र असलेले सोन्याचे नाणे, दोन सोन्याच्या बांगड्या आणि 1,300 ग्रॅम आणि 200 मिलिग्रॅमच्या दोन इंगॉट्सचा समावेश आहे. त्यांची किंमत 8 कोटी रुपये आहे, अर्जन दासवानी यांचा मुलगा राजू दासवानी यांनी सर्व बिले आणि पावत्या सादर केल्या. त्यानंतर हे दागिने दासवानी यांच्याकडे सुपूर्द केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी