मुंबई: Mumbai Swine Flu Case: कोरोनानंतर आता मुंबईत (Mumbai) स्वाइन फ्लूनं (Swine flu) लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस (heavy rain) आहे. या पावसामुळे अनेक आजारात वाढ झाली आहे. वेगवेगळ्या आजारांचा प्रार्दुभाव वाढल्याचं दिसून येत आहे. सध्या मुंबईत सर्दी, ताप, मलेरिया यासारख्या आजारांसह स्वाईन फ्ल्यूचा (Swine Flu) प्रार्दुभाव वाढत असल्याचं दिसून येतेय. मुंबईत सध्या स्वाइन फ्लूची लागण झालेले किमान चार जण व्हेंटिलेटरवर आहेत.
मुंबई शहरात पुन्हा एकदा स्वाइन फ्लूचा फैलाव होत आहे. ज्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येत आहे, त्यांनीही स्वाईन फ्लूची तपासणी करावी, असा इशारा डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. या महिन्यात मुंबईत आतापर्यंत स्वाइन फ्लूचे एकूण 11 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या आजाराची तीव्रता पाहता रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता जास्त आहे. कोविड-19 प्रमाणेच, H1N1 म्हणजेच स्वाइन फ्लू हा एक श्वसन रोग आहे जो 2019 मध्ये जागतिक महामारी म्हणून सुरू झाला होता मात्र त्याचा प्रार्दुभाव लवकर कमी झाला.
अधिक वाचा- National Herald Case: अखेर तो दिवस आला, आज दिल्लीत काँग्रेस नेते उतरणार रस्त्यावर
गेल्या आठवड्यात पहिला मृत्यू
गेल्या आठवड्यात राज्यात H1N1 मुळे पहिल्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. 10 जुलै रोजी पालघरच्या तलासरी येथील 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. वांद्र्याच्या लीलावती रुग्णालयात 50 वर्षांखालील दोन रुग्ण एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) थेरपीवर आहेत. ज्या थेरपीला शेवटचा उपाय मानला जातो आणि व्हेंटिलेटर सपोर्ट अयशस्वी झाल्यानंतर देण्यात येतो.
हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लूने वॉर्डमध्ये आणखी पाच रुग्ण दाखल आहेत. पल्मोनोलॉजिस्ट डॉ प्रल्हाद प्रभुदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, H1N1 च्या गंभीर संसर्गामुळे या रुग्णांच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम झाला आहे. ते म्हणाले, स्वाइन फ्लूच्या चाचणीत फ्लूसारखी लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी किमान 50% रुग्ण पॉझिटिव्ह आढळतात. मुंबईत स्वाइन फ्लू आणि कोरोना व्हायरसमध्ये टक्कर असल्याचं बोललं जात आहे.
टाइम्स ऑफ इंडियानं डॉ राजेश शर्माच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ सुमारे तीन आठवड्यांपूर्वी सुरू झाली. हे रुग्ण खूप ताप आणि श्वासोच्छवासाच्या संसर्गानं येतील पण त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. प्रभावी औषधे उपलब्ध असल्यानं स्वाइन फ्लूवर योग्य उपचार करणं महत्त्वाचं आहे. उपचारात उशीर झाल्यास रुग्णाची स्थिती बिघडण्याची शक्यता आहे.