Foxconn नंतर आता आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये, सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बडोद्यात होणार

C-295 transport aircraft for the Indian Air Force to be manufactured by TATA-Airbus: एक मोठी बातमी समोर आली आहे. फॉक्सकॉन नंतर आता आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. 

After Foxconn now one more project shifted in gujarat c-295 transport aircraft for Indian air force to be manufactured in vadodara
Foxconn नंतर आता आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये, सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बडोद्यात होणार (Photo Courtesy: Airbus) 
थोडं पण कामाचं
  • आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये, सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बडोद्यात होणार
  • 22 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातमध्ये होणार
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 30 ऑक्टोबरला कोनशिलेचं उद्घाटन

C-295 transport aircraft for the Indian Air Force: महाराष्ट्रात होणारा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर आता आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एअरबस सी-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प गुजरातमधील वडोदरा येथे होणार आहे. या प्रकल्पासाठीचे भूमिपूजन येत्या 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे. (After Foxconn now one more project shifted in gujarat c-295 transport aircraft for Indian air force to be manufactured in vadodara)

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता 22 हजार कोटींचा आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये होणार हे स्पष्ट झालं आहे. संरक्षण खात्याचे सचिव अजय कुमार यांनी सांगितले की, भारताने आपल्या वायूदलाच्या ताफ्यात असलेल्या एवरो-748 या विमानांच्या जागेवर 56 सी-295 वाहतूक विमान खरेदी करण्यासाठी एअरबस डिफेंस अँड स्पेससोबत जवळपास 22 हजार कोटींच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

हे पण वाचा : या कारणांमुळे Love मॅरेज यशस्वी होतात

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे चर्चा करत असून इतर प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, त्यानंतर आता सी-295 प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

हे पण वाचा : दारू प्यायल्यावर कोणत्या राशीची व्यक्ती कशी वागते?

मिळालेल्या माहितीनुसार, सी-295 चा प्रकल्प महाराष्ट्रातील नागपूर येथे आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू होते. मात्र, आता हा प्रकल्प गुजरातमधील बडोद्यात होणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रातून गेलेल्या प्रकल्पांची यादी

फॉक्सकॉन - 1 लाख 54 हजार कोटींचा प्रकल्प

ब्लक ड्रग - 30 हजार कोटींचा प्रकल्प

एअर बस - 22 हजार कोटींचा प्रकल्प

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी