Sunil Raut: संजय राऊतांना अटक, दुसऱ्या राऊतांनी सुरू ठेवला पत्रकार परिषदेचा सिलसिला

गावगाडा
पूजा विचारे
Updated Aug 01, 2022 | 12:35 IST

Sanjay Raut Brother Sunil Raut: संजय राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर त्यांची जागा घेत दुसऱ्या राऊतांनी म्हणजे सुनील राऊत यांनी आजची सकाळची पत्रकार परिषद घेतली.

Sunil Raut
सुनील राऊत  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • शिवसेना नेते (Shiv Sena leader) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली.
  • अटकेनंतर रोजच्या पत्रकार परिषदांमध्ये खंड पडेल असं वाटत होतं. मात्र या पत्रकार परिषदेत खंड पडला नाही.
  • संजय राऊत जरी ईडीच्या कोठडीत असले तर त्यांची जागा त्यांचा भाऊ सुनील राऊत (Sunil Raut) यांनी घेतली.

मुंबई: Sunil Raut Press Conference: शिवसेना नेते (Shiv Sena leader) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली. पत्राचाळ प्रकरणात रविवारी रात्री उशिरा ईडीकडून ही कारवाई केली गेली. संजय राऊत यांना अटक (Arrest) केल्यानंतर सर्वांनंचं  लक्ष लागून राहिले होतं ते दैनंदिन पत्रकार (press conference) परिषदेकडे. संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेत असतात. मात्र त्यांच्या अटकेनंतर रोजच्या पत्रकार परिषदांमध्ये खंड पडेल असं वाटत होतं. मात्र या पत्रकार परिषदेत खंड पडला नाही. संजय राऊत जरी ईडीच्या कोठडीत असले तर त्यांची जागा त्यांचा भाऊ सुनील राऊत (Sunil Raut) यांनी घेतली. 

संजय राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर त्यांची जागा घेत दुसऱ्या राऊतांनी म्हणजे सुनील राऊत यांनी आजची सकाळची पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांच्या परिषदेचा सिलसिला सुनील राऊतांनी सुरू ठेवला. 

अधिक वाचा- मोठी दुर्घटना: जनरेटरच्या वायरिंगमुळे पिकअप व्हॅनला लागला करंट, 10 जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी

सुनील राऊत हे संजय राऊत यांचे भाऊ असतून ते भांडूपमधील आमदार आहे. संजय राऊतांना अटक होताच त्यांना त्यांची जागा घेत पत्रकार परिषदेचा मोर्चा सांभाळला आहे. कालपासून सुनील राऊत सातत्यानं प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना दिसत आहे. संजय राऊतांना अटक केल्यानंतरही सुनील राऊतांनी पहिली प्रतिक्रिया दिली. तसंच आज सकाळीही त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 

काय म्हणाले सुनील राऊत 

या पत्रकार परिषदेत सुनील राऊत यांनी भाजप आणि ईडीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांना खोट्या केसमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात खोटे पुरावे जमा केले जात असल्याचं सुनील राऊत यांनी म्हटलं आहे. तर शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांना एकटं पाडायचं आणि शिवसेनेला संपवण्याचा हे प्लॅनिंग असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. भाजपकडून सुडबुद्धीनं कारवाई केली जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

सुनील राऊतांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

यावेळी सुनील राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांना अटक केल्यानंतर, आता सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झाला, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. यावर आता सुनील राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. शिवसेनेचा भोंगा बंद होणार नाही. संजय राऊत यांना अटक केलीत तरी आम्ही लढत राहू. एकनाथ शिंदे तुमचाही भोंगा काही दिवसांनी बंद होईल, अशा शब्दात सुनील राऊत यांनी एकनाथ शिंदेंना उत्तर दिलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी