Crime News : 17 दिवसांनी वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह शोधून काढला, 'असा' करण्यात आला होता खून

Nilesh Varaghde's body was found after 17 days : निलेश वरघडे हे वास्तूशास्त्र सल्लागार होते. वरघडे यांचा ज्या आरोपीनी खून केला ते आरोपी हे  निलेश यांच्या परिचयाचे होते. दोघांनी निलेश यांना कॉफीतून गुंगीचे ओैषध दिले. बेशुद्ध पडल्यानंतर निलेश यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी निलेश यांचा मृतदेह पोत्यात भरून नीरा नदीत टाकून दिला होता.

Nilesh Varaghde's body was found after 17 days
१७ दिवसांनी वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह शोधून काढला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिबवेवाडीतील वास्तुशास्त्र सल्लागाराच्या खुनानंतर तब्बल 17 दिवसांनी त्यांचा मृतदेह पोलिसांना सापडला
  • दोघांनी निलेश यांना कॉफीतून गुंगीचे ओैषध देवून त्यांचा आवळला होता गळा
  • वरघडे यांचा ज्या आरोपीनी खून केला ते आरोपी हे  निलेश यांच्या परिचयाचे होते

Crime News : पुणे : राज्यात गुन्ह्याच्या घटनात मोठी वाढ होताना दिसत आहे. बिबवेवाडीतील वास्तुशास्त्र सल्लागाराच्या खुनानंतर तब्बल 17 दिवसांनी त्यांचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. निलेश वरघडे (वय 43 , रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असं खून झालेल्या वास्तूशास्त्र सल्लागाराचे नाव असून, निलेश वरघडे यांचा मारेकऱ्यांनी अपहरण करून खून केला होता. त्यानंतर वरघडे यांचा मृतदेह हा निरा नदीत फेकून देण्यात आला होता. वरघडे यांचा खून झाल्यानंतर त्यांचा मृतदेह निरा नदीतून शोधण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात आली होती. दरम्यान, त्यांचा मृतदेह 17 दिवसांनी शोधून काढला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीसांनी दोघांना अटक केली होती. (after seventeen days diabody found of kidnapped person in pune two arrested by police)

अधिक वाचा ; D Gang: दाऊद इब्राहिम-छोटा शकीलविरुद्ध NIAची मोठी कारवाई

दोघांनी निलेश यांना कॉफीतून गुंगीचे ओैषध देवून त्यांचा आवळला होता गळा

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश वरघडे हे वास्तूशास्त्र सल्लागार होते. वरघडे यांचा ज्या आरोपीनी खून केला ते आरोपी हे  निलेश यांच्या परिचयाचे होते. दोघांनी निलेश यांना कॉफीतून गुंगीचे ओैषध दिले. बेशुद्ध पडल्यानंतर निलेश यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी निलेश यांचा मृतदेह पोत्यात भरून नीरा नदीत टाकून दिला आणि तेथून ते पळून गेले. तांत्रिक तपासावरून पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, वरघडे यांचा खून नेमका का केला याचा उलघडा अद्याप पर्यंत झाला नाही. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे दीपक जयकुमार नरळे (रा. नर्‍हे, आंबेगाव), साथीदार रणजीत ज्ञानदेव जगदाळे (वय २९) अशी आहेत. याबाबत रुपाली रुपेश वरघडे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींना अटक केल्यापासून पोलिसांनी निरा नदीत निलेश यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

अधिक वाचा ; महिला आपल्याच मुलाच्या मुलीची झाली आई, नातीला दिला जन्म 

अखेर सतराव्या दिवशी वरघडे यांचा मृतदेह शोधून काढण्यात यश

पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने गेल्या 17 दिवसांपासून निलेश यांच्या मृतदेहाचा निरा नदीत शोध घेत होते.पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स, भोईराज आपत्ती संघ, महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संघाच्या मदतीने अखेर सतराव्या दिवशी वरघडे यांचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सदर कामगिरी केली आहे.

अधिक वाचा : IND Vs ZIM: उपांत्य फेरीसाठी आज भारत- इिम्बाब्वे आमने-सामने

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी