Maharashtra Petrol Diesel Price : महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल स्वस्त; राज्यसरकारने इंधनावरील कर केला कमी

केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारनेही इंधनावरील अबकारी कर कमी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळाला आहे.

petrol diesel price
पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारनेही इंधनावरील अबकारी कर कमी केला आहे
  • त्यामुळे महाराष्ट्रातही सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळाला आहे.

Petrol Diesel Prie Cut : मुंबई :केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारनेही इंधनावरील अबकारी कर कमी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने पेट्रोलवरील ९.५० रुपये तर डिझेलवरील ७ रुपये कमी केले आहे. त्यामुळे १०५.४१ रुपयांना मिळणारे पेट्रोल ९५.९१ रुपयांना मिळत आहे. तर ९६.६१ रुपयांना मिळणारे डिझेल ८९.६७ रुपयांना मिळणार आहे. आता केंद्र सरकारपाठोपाठ राज्यसरकारनेही पेट्रोल डिझेलवरील व्हॅट घटवला आहे. राज्य सरकारने पेट्रोलवरील २ रुपये ८ पैसे आणि डिझेलवरील १ रुपये ४४ पैसे व्हॅट कमी केला आहे. इंधनावरील दर कमी केल्याने राज्याच्या तिजोरीवर अडीच हजार कोटी रुपयांचा भार पडणार आहे अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे.

राजस्थानमध्ये इंधन दरांत घट

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे. राजस्थान सरकारने पेट्रोलवरील २.४८ रुपये तर डिझेलवरील १.१६ रुपये व्हॅट कमी केला आहे. यामुळे पेट्रोल १०.४८ रुपयांनी तर डिझेल ७.१६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीला १२०० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. असे असले तरी यामुळे सर्वसामान्यांन महागाईतून दिलासा मिळेल असा विश्वास गेहलोत सरकारने व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी